श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेचे रविवारी आयोजन
साधक आणि भाविकभक्तांनी श्रीगुरुदेव श्रीनिवासजींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १८ जुलै – भगवान वेदव्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा रविवार दिनांक २१ जुलै रोजी संपन्न होत आहे. सदर गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवास जिज्ञासू, साधक आणि भाविकभक्तांना दर्शन देत असतात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न होणारा परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शन सोहळा रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत श्रीविद्याअखंडमहायोग अभ्यास केंद्र, चंद्रलोक नगर, इंडियन मॉडेल स्कुलजवळ, जुळे सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
दरम्यान भाविक भक्त आणि साधकांना पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचे दर्शन सकाळी ८ ते दुपारी १ या कालावधीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन घेता येणार आहे. पूज्य श्रीगुरुदेवांच्या दर्शनाची वेळ सकाळच्या सत्रात अर्थात ८ ते १ यावेळेत नियोजित केलेली असल्याने इच्छुक दर्शनार्थी भाविकभक्तांनी निर्दिष्ट केलेल्या वेळेतच पूज्य श्रीगुरुदेवांचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने करण्यात येत आहे.
या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी लिखित गीतार्थ संजीवनी’ नामक श्रीमद्भग्वद्गीतेच्या नवव्या अध्यायावरील टीका तसेच `श्रीविघ्नेश्वर विनायक गणेशयंत्र रहस्यप्रकाश’ हे दोन नूतन ग्रंथ प्रकाशित होत आहेत.