लाडकी बहीणसह कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीला साथ द्या :- आ.सुभाष देशमुख

डोणगाव येथील सभेत आमदार सुभाष देशमुख यांचे ग्रामस्थांना आवाहन….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –

महाविकास आघाडी सरकारने भाजपाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले जलयुक्त शिवारसह अनेक बंद पडल्या आहेत. आता त्यांची नजर लाडकी बहीण योजनेवर आहे ही योजना बंद पडावी म्हणून महाआघाडी सरकार कोर्टात गेले आहे. या लाडक्या बहिणीच्या सावत्र भावांना जनतेने आता धडा शिकवावा आणि लाडकी बहीणसह अनेक विकासात्मक योजना सुरू करण्यासाठी महायुतीला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

    बुधवारी आमदार सुभाष देशमुख यांनी सकाळी डोणगाव, माळकवठे, कुरघोट, औज, मंद्रूप, कारकल, सादेपूर, बाळगी, निंबर्गी, लवंगी यासह विविध भागात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला डोणगाव येथील जाहीर सभेत बोलताना आमदार साहेब देशमुख पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर जलयुक्त शिवार ही योजना बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मधल्या काळात अतोनात नुकसान झाले. मात्र पुन्हा महायुती सत्तेत आल्यानंतर उबाठा सरकारने बंद पाडलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू केल्यास याशिवाय अनेक लोकहितकारी योजनाही अंमलात आणल्या आहेत.  यामध्ये लाडके बहीण योजनेचा समावेश आहे. दक्षिण तालुक्यातील जवळपास 60 हजारांपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आरोग्य विमा, पीक विमाही काढला आहे शेतकरी सन्मान योजनाही सुरू केली आहे. याशिवाय युवकांसाठी लाडका भाऊ योजना आणलेली आहे. विशेष म्हणजे या सर्व योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होत आहेत. युवकांसाठी उद्योजक बनावे म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ सुरू केले आहे. यामध्ये युवकांना १ लाखांपासून ते १५ लाखांपर्यंत कर्ज मिळत आहे. याशिवाययु वकांना उद्योजक बनवण्यासाठी विविध महामंडळही महायुतीने स्थापन केली आहे. याद्वारे ही युवकांना आर्थिक मदत केली जात आहे. महिला महिलांसाठी तीन सिलेंडर मोफत असणारी अन्नपूर्णा योजना ही सुरू केली आहे या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले आहे त्यामुळेच विरोधकांनी लाडकी बहीण यासारख्या योजनेला स्टे आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांनी आता जागृत होऊन महाआघाडी सरकारला धडा शिकवावा महाआघाडी सरकार चुकून सत्तेत आल्यास या सर्व कल्याणकारी योजना बंद पडणार आहे. या सर्व योजना पुन्हा चालू ठेवण्यासाठी महायुती सरकारला सर्वांनी निवडून द्यावे असे आवाहनही आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

महायुती सत्तेत आल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. दक्षिण तालुक्याला राज्यातील मॉडेल मतदारसंघ करण्याचा आपला मानस आहे.;गेल्या दहा वर्षात तालुक्यात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात आणि दर्जेदार झाली, हर घर नल, जलजीवन मशीन योजनेच्या माध्यमातून घराघरात पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे काम महायुती सरकार ने केले आहॆ.

दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळावी म्हणून येणाऱ्या काळात सौरऊर्जा चा वापर महायुती सरकार अंमलात आणणार आहे.  यासह अनेक लोककल्याणकारी हिताची कामे माहिती सरकार करणार आहे त्यामुळे मतदारांनी महायुतीला पुन्हा एकदा साथ द्यावी.यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके,हणमंत कुलकर्णी, चनगोंडा हाविनाळे,नामदेव पवार,मळसिद्ध मुगळे,अंबिका पाटील,अप्पासाहेब मोटे,सचिन पाटील, साहेबलाल हवालदार,प्रसाद कुलकर्णी व ग्रामस्थ उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *