दक्षिण सोलापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारा ; दक्षिण तालुका मॉडेल तालुका करणार :- आ.सुभाष देशमुख  ; पालकमंत्रीपद मिळाले असते तर व्यक्त केली खंत

दक्षिण सोलापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारा ; दक्षिण तालुका मॉडेल तालुका करणार :- आ.सुभाष देशमुख…

पालकमंत्रीपद मिळाले असते तर जिल्हयाचा चेहरा बदलला असता ; बापूंनी केली व्यक्त केली खंत..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२६ ऑक्टोबर- सोलापूर दक्षिण मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे केली आहे, तालुक्यात निरक्षरांचे प्रमाण अधिक असल्याने जातिभेद वाढला आहे. यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. भविष्यात दक्षिण सोलापूरला मॉडेल तालुका करून तरुणांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

   यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, दहा वर्षात प्रत्येक गावाला निधी देऊन विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. रस्ते, सभामंडप, सिमेंट काँक्रीट रस्ते, आरोग्यसुविधा यासह इतर विविध गोष्टींसाठी कोट्यावधींचा निधी दिला आहे. विरोधकांच्या कुटील राजनीतीमुळे मंद्रुपची एमआयडीसी रद्द होणे तालुक्या साठी दुर्देवाची आहे. एमआयडीसी मंजूर करण्यासाठी जिवाचे रान केले मात्र विरोधकांनी अडथळा आणल्यामुळे बेरोजगार तरुणांचे स्वप्न पुळीस मिळाले. त्यामुळे भविष्यात दक्षिणम घील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुन्हा एमआयडीसी मंजूर करून आणणार आहे. होटगी, नांदणी, कुडल व वडकबाळ येथील पर्यटन केंद्रामुळे रोजगार निर्मिती होऊन गावची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. होटगी, वडकबाळ येथे पर्यटन केंद्रात लहान मुलांची खेळणी व बोट उपलब्ध करून देणार असून या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. सीना भीमा जोडकालव्यासाठी ४०० कोटी निधी मंजूर असून २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. वडापूर बॅरेजेससाठी ७४ कोटी निधी मंजूर असून यामुळे २ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून अर्धा टीएमसी पाणीसाठवण होणार आहे. यामुळे विविध माध्यमातून रोजगार मिळणार आहे. वडापूर बॅरेजेस पथदर्शी असल्याने जमीन संपादन न करता भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ २२ बॅरेजेस बांधण्यात येणार आहे. यामुळे दक्षिणमधील शेतकऱ्यांचे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शिवाय जमिनीच्या किमती वाढण्यास मदत होणार आहे. दक्षिणमधील सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना अंमलात आणणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. तालुक्यात साठ वर्षात झाले नाही इतकी विकासकामे कोणताही भेदभाव न करता केली आहेत. विरोधकांना मी केलेली विकासकामे पाहवत नाहीत तसेच त्यांना पचत नसल्यामुळे आमदार सुभाष देशमुख विकास करीत आहेत म्हणून विरोध करण्यात येत आहे.

प्रचारसभांऐवजी बैठकांवर भर

बैठकांमधून कार्यकर्ते व मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. शिवाय समस्या सोडविण्या साठी उपाययोजना करता येऊ शकतो. म्हणून निवडणूक काळात प्रचारसभांऐवजी बैठका घेण्यावर भर देणार असल्याचे आ. देशमुख म्हणाले.

पदांपेक्षा कार्यकर्त्यांची संख्या कमी

भाजपामध्ये विविध विभागात मोठया प्रमाणात पदे आहेत. कार्यकत्यांना पदे नसल्यामुळे नाराजी असल्याचे सांगण्यात येते. मात्र अनेक पदे कार्यकर्ते नसल्याने रिक्त आहेत. त्यामुळे पद नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे अफवा असल्याचे सांगितले.

देशमुख कुटुंबाच्या नावे ठेका नाही

दहा वर्षात देशमुख कुटुंबाच्या नावे एकही ठेका नाही. पाच वर्षापूर्वी माझ्याबरोबर ठेकेदार होते, मात्र पाच वर्षापासून एकही ठेकेदाराचा संबंध नाही. त्यामुळे देशमुख कुटुंब टक्केवारीसाठी स्वता कामे करतात ही टिका चुकीची असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

शेवटच्या मिनिटात वडापूर बॅरेजेस प्रस्ताव मंजूर

मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली मात्र त्याच दिवशी ३.२९ वाजता वडापूर बॅरेजेस मंजूर प्रस्ताव मंजूर झाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून वडापूर बॅरेजेस मंजूर झाल्याचे सांगितल्याने शेवटच्या मिनिटात बरेजेस मंजूर झाला अशी माहिती आमदार देशमुख यांनी दिली.

मतदारसंघ लय भारी बनविणार

दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रत्येक गावात दीड ते दोन कोटी रुपये विकासनिधी दिला आहे. दहा वर्षात मतदारसंघात विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण, रोजगार, सिंचन, पर्यटन यासह इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना मतदारसंघ आर्थिकदृष्टया लय भारी करणार आहे.

लॉजेस्टीक पार्कसाठी ४०० कोटी

सोलापूर दक्षिण मतदारसंघ मॉडल करण्यासाठी होटगी येथे पर्यटन केंद्र उभारला आहे. पर्यटन केंद्राजवळ सातशे एकर क्षेत्रावर लॉजिस्टीक पार्कसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ४०० कोटी निधी मंजूर केला आहे. यामुळे परराज्यातील मालवाहतुकसह इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.

नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

भाजपमधील माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या नाराज गटातील सर्वांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

भविष्यात विकासकामांना प्राधान्य देणार

वडापूर बॅरेज, भीमा सीना जोडकालवा, देगाव कालवा, मंद्रुप एमआयडीसी, कुडल पर्यटन व तीर्थक्षेत्र, तरुणांना रोजगार, शेतीपूरक व्यवसाय, सौरऊर्जा पंप, दर्जे दार शिक्षण, धुबधुबी तलाव पाणी, लॉजिस्टीक पार्क, सिद्धेश्वर वनविहार, मंद्रुप पोलीस वसाहत आदी कामांना प्राधान्य देणार आहे.

पालकमंत्रीपद मिळाले असते तर जिल्हयाचा चेहरा बदलला असता

पाच वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात सांगलीऐवजी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्रीपद मिळाले असते जिल्हयाचा चेहराम ोहरा बदलला असता. दक्षिण तालुक्यासह सोलापूर जिल्हा राज्यात प्रगतीपथावर दिसला असता. मात्र दुर्दैवाने मला पालकमंत्री मिळाले नसल्याने जिल्हयाच्या विकास खुंटला असल्याचे आमदार सुभाष देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *