सत्ताधारी आमदारांना देणार जोरदार टक्कर – संतोष पवार ….!

सत्ताधारी आमदारांना देणार जोरदार टक्कर – संतोष पवार 

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात वंचितचे संतोष सेवू पवार यांचाच बोलबाला…..!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.१३ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. विकास कामांच्या शिदोरीवर सत्ताधारी आमदार आखाड्यात उतरले आहेत. तर विरोधी उमेदवार नवीन व्हिजन घेऊन निवडणुकीत आपला कस आजमावत आहेत. या स्पर्शभूमीवर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांना शहरी आणि ग्रामीण भागात पवार यांची क्रेझ वाढत आहे. संतोष पवार हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक युवा नेतृत्व असून, मतदारसंघात त्यांची प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहे.

शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे, अपक्ष धर्मराज काडादी, शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे गटाचे अमर पाटील, भाजपचे सुभाष देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांच्यात काट्याची लढत आहे. विशेषतः ग्रामीण भागात संतोष पवार यांचे गेली २/३ वर्षातील सक्रिय कार्य पाहता त्यांना जास्तीत जास्त नागरिकांचे सहानुभूती मिळत आहे. शहरी भागातही त्यांची असलेली दमदार छबी, युवा, निर्व्यसनी आणि वकृत्वात, नेतृत्वात कार्यकुशल असलेला नवोन्मुख चेहरा म्हणून मतदारांमध्ये त्यांची ओळख असून विजयाबद्दल आत्मविश्वास वाढत आहे.

       

दरम्यान संतोष पवार यांच्या प्रामाणिक आणि संघर्षशील प्रवृत्तीमुळे विविध समाजघटक त्यांच्याभोवती एकत्र येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाचे नवे अध्याय लिहिले जातील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात संतोष पवार यांच्या विजयाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *