सोमेश वैद्य यांचा सोलापूरात वाढतोय जनसंपर्क ; नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी देताहेत प्राधान्यक्रम
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर , दि. १२ सप्टेंबर – सामाजिक कार्यकर्ते तथा दक्षिण सोलापूर तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तयारी करत असलेले सोमेश वैद्य नागरिकांमध्ये जाऊन विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिण तालुक्यातील गावात कॉर्नर बैठका प्रत्येक नगरातील नागरिकांना संपर्क साधून समस्या जाणून घेतल्या जात आहेत. यावेळी जनसंपर्क वाढवून त्यांनी जनतेची कामे पूर्णत्वास नेत असताना चित्र दिसून येत आहे. यावेळी नागरिकांशी संपर्क साधताना सोमेश वैद्य म्हणाले, की फक्त तुमची मला साथ असू द्या.. तुमच्या नगराचा विकास आचार संहितेपूर्वी पूर्ण करून देतो असे आश्वासन दक्षिणचे भावी आमदार सोमेश वैद्य यांनी दिला आहे.
दरम्यान द्वारका नगरातील काही महिलांनी सोमेश वैद्य यांच्याशी बोलताना आपणास आमच्या द्वारकानगरातील महिलांचा आपणास संपूर्ण पाठिंबा आहे , फक्त निवडणुकीत लढा असा विश्वास सोमेश वैद्य यांना येथील महिलांनी दिला आहे. यावेळी वैष्णवी महिला बचत गटाचे अध्यक्ष मंगल लोंढे , दिपाली शिवणकर, अर्चना कोकरे , महादेवी काळे, ज्योती म्हेत्रे, रंजना भोई, वर्षा राऊत , जगदेवी म्हेत्रे , भारती कोंढापुरे, मयुरी गायकवाड, शांता पारधे, धानम्मा मंद्रूपकर, इंदिराबाई भोई, संगीता कोळी, जगदेवी येगुरे , पुजा पारधे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.