देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी खास सवलतीच्या दरात स्विफ्ट कार उपलब्ध…

देशांच्या जवानांसाठी माफक दरात स्विफ्ट कार उपलब्ध : कर सवलतीत मिल्ट्री कॅन्टीन स्टोअर्स मध्ये मिळणार स्विफ्ट कार 

सोलापूर व्हिजन :- मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात नवीन दमदार स्विफ्ट कार बाजारात उतरवली. लाँचिंगपूर्वीच ग्राहक या कारवर फिदा झाले आहेत. कार खरेदीसाठी नोंदणीचा वेग वाढला आहे  त्यानंतर आता कर कमी झाल्याची वार्ता येऊन धडकली आहे.
त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. पण ही ऑफर सर्वच ग्राहकांसाठी नाही. आता कंपनीने कँटीन स्टोअर्स डिपार्टमेंट म्हणजे CSD वर ही कार उपलब्ध करुन दिली आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी CSD चालविण्यात येते. देशातील विविध शहरात ही स्टोअर्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी कारवर अत्यंत माफक जीएसटी द्यावा लागतो. 28 टक्के जीएसटी ऐवजी 14 टक्के वस्तू आणि सेवा कर द्यावा लागतो.
कराचे 1.19 लाख येतील वाचविता
शोरुममध्ये नवीन स्विफ्टच्या LXI ट्रिमची किंमत 6,49,000 रुपये आहे. तर सीएसडीवर हीच कार 5,72,265 रुपयांपासून विक्री होते. बेसिक व्हेरिएंटवर 76,735 रुपयांचा कर वाचविता येतो. विविध व्हेरिएंटच्या हिशोबाने कराच्या रुपाने 1,19,597 रुपये वाचविता येतात. व्हेरिएंटनुसार कारच्या किंमतीत फरक पडेल. मोठी बचत होईल.
नवीन स्विफ्टचे डिझाईन, फीचर्स
मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्टमध्ये एकदम नवीन इंटिरीअर पाहायला मिळेल. ते दिसायला जोरदार आहे. या कारमध्ये वायरलेस चार्जर आणि ड्युअल चार्जिंग पोर्ट मिळेल. यामध्ये रिअर व्ह्यू कॅमेरा मिळेल. त्यामुळे चालकाला कार पार्किंग करताना अडचण येणार नाही. यामध्ये 9 इंचाची फ्री-स्टॅंडिंग इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळेल. या नवीन डिझाईन केलेला डॅशबोर्ड मिळतो. स्क्रीन वायरलेस कनेक्टिव्हिटीसह अँड्राईड ऑटो अँड ॲप्पल कारप्लेचा सपोर्ट मिळतो. सेंटर कन्सोलला पुन्हा डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये बलेनो आणि ग्रँड व्हिटारासारखेच ऑटो क्लायमेंट कंट्रोल पॅनल आहे. याशिवाय या कारमध्ये नवीन एलईडी फॉग लॅम्प मिळतो.कंपनीने नवीन स्विफ्ट कारमध्ये LXi, VXi, VXi(O), ZXi,ZXi+ आणि ZXi ड्युअल टोन असे 6 व्हेरिएंट आहेत. नवीन मारुती स्विफ्टच्या बेसिक व्हेरिएंट LXi ची किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेल ZXi ड्युअल टोनसाठी 9.64 लाख रुपये खर्च येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *