समाजकल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे समाज कल्याण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०६ फेब्रुवारी
सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी या पदावर सध्या कार्यरत असलेले आणि जात पडताळणी समितीकडील सदस्य सचिन कवले यांना देण्यात आलेला समाज कल्याण अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार अखेर गुरुवारी काढण्यात आला आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार दिलेले सचिन कवले त्यांचा पदभार रद्द करून त्यांच्या ठिकाणी समाजकल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
दरम्यान, तत्कालीन समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर कित्येक दिवस हे पद रिक्तच होते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त पदभार चार महिन्यापूर्वी जात पडताळणी समितीकडील सचिन कवले यांच्याकडे समाज कल्याणचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.