कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य ; शहर युवक काँग्रेस आक्रमक…!
गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. १९ सप्टेंबर – कॉंग्रेस नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू , खा. अनिल बोंडे, आ.संजय गायकवाड, दिल्लीचे माजी आमदार तरवींदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान गांधी कुटुंबियाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे. देशाविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी , राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची भाषा केली जात आहे. राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी जबाब नोंदवून घेतला.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर, सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला , शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, प्रवक्ते दाऊद नदाफ, शरद गुमटे, महेंद्र शिंदे ,धीरज खंदारे ,सुशीलकुमार म्हेत्रे, विवेक कन्ना,राजेंद्र शिरकुल,आकाश जांभळे, अजिंक्य पाटील,श्रीनिवास परकीपंडला, सुनील सारंगी, उमेर बेनोशिरुर, चंद्रकांत नाईक,श्रीनिवास परकीपंडला,अजय जाधव,अक्षय दिल्लीवाले, शाहू सलगर, यासीन शेख,सूरज शिंदे,युवराज दोडमनी,सूरज कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.