धर्मराज काडादी यांच्या विजयाचा घरोघरी संकंल्प
विजापूर रोड परिसरातील पदयात्रेत महिलांचा उत्साह मोठा ….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ नोव्हेंबर –
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांन निवडून देण्याचा संकल्प विजापूर रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला. मंगळवारी, सकाळी काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत महिलांचा उत्साह मोठा होता. काडादी हे सर्व समाशेक व्यक्तिमत्वाचे असून सर्वांना सोबत घेऊन जाणार आहेत. विकासाची दृष्टी असलेल्या काडादी यांच्या विजयाचा निर्धार मतदारांनी बोलून दाखविला.मतदार मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून काडादी यांचे अंतःकरणपूर्वक स्वागत केले तर सुवासिनींनी औक्षण करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्पदेखील यावेळी करण्यात आला.
सकाळी साडे आठ वाजता जुना विजापूर नाका येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल-ताशाच्या निनादात ही भव्य-दिव्य पदयात्रा निघाली. श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय, श्री सिध्देश्वर परिवाराचा विजय असो, निवडून निवडून येणार कोण, काडादी साहेबांशिवाय येणार कोण, हवा कुणाची, काडादी साहेबांची, काडादीसाहेब तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, काडादी साहेबांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी मतदारांनी दिल्या.
या पदयात्रेत श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, राजशेखर पाटील, शिवानंद पाटील-कुडल, विद्यासागर मुलगे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष डॉ. भारत जाधव, ज्येष्ठ नेते सदाशिव बनसोडे, प्रा. विलास मोरे,माजी चेअरमन रामलिंग शिंदे, प्रा. लहू गायकवाडयांच्यासह सिध्देश्वर परिवरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोलापूर दक्षिण मतदार संघातील सर्वपक्षीय कार्यकर्तेही या पदयात्रेत सहभागी झाले होते.
मतदारांना सक्षम पर्याय हवा आहे
पदयात्रेच्या सांगता प्रसंगी विविध माध्यमांशी बोलतांना काडादी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पदयात्रेखा वृत्तांत सांगितला. देश, राज्य आणि महापालिकेतही त्यांच्याच हाती कारभार होता. मात्र, सूड आणि कुरघोडीच्या राजकारणाशिवाय सत्ताधार्यांनी काहीच केले नसल्याने कंटाळलेल्या जनतेला सक्षम पर्याय हवा आहे. पदयात्रेस मिळत असलेला दणदणीत प्रतिसाद त्याचाच पुरावा आहे.ही निवडणूकी जनतेनेच स्वतच्या हाती घेतली असून आपण केवळ निमित्त असल्याचे धर्मराज काडादी यांनी सांगितले.