बाबा मिस्त्रींच्या प्रचारार्थ बच्चू कडू मैदानात ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर बॅटने करणार प्रहार !

बाबा मिस्त्रींच्या प्रचारार्थ बच्चू कडू मैदानात ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर बॅटने करणार प्रहार !

नई जिंदगी येथे करणार प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.७ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी आपले नशीब आजमावलेले, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाकडून मैदानात उतरले आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाकडून गत विधानसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळवले होते. लोकांचा दांडगा संपर्क, रुग्णसेवा आणि लोक चळवळ या माध्यमातून बाबा मिस्त्री यांनी नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. याच जोरावर बाबा मिस्त्री यांनी पुन्हा एकदा दक्षिणच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. काँग्रेस पक्षाने डावल्याने यंदा त्यांनी प्रहारच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात हाती बॅट घेऊन उतरले आहेत.

दरम्यान बाबा मिस्त्री यांच्या प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू सोलापूर दौऱ्यावर येणार नई जिंदगी येथे त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येऊन दक्षिण तालुक्यातील विविध गावांना गाव भेट दौऱ्यात संबोधित करणार आहेत. दक्षिण तालुक्यातील औराद, तेरा मैल, कंदलगाव, भंडार कवठे, निम्बर्गी आणि मंद्रूप या गावात सभा होणार आहेत. तर नंतर सायंकाळी पाच वाजता नई जिंदगी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. गत विधानसभा निवडणुकीत बाबा मिस्त्री यांनी ५० हजारांची मते घेतले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत किती मत घेणार हे येणारा वेळ ठरवणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *