संतोष पवार यांची प्रचारात घेणार आघाडी ; हत्तुर येथून होणार प्रचारास प्रारंभ.
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज,
सोलापूर, दि.४ नोव्हेंबर – सोलापूर दक्षिण विधान सभा मतदार संघाचे, वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत जनप्रिय उमेदवार संतोष पवार यांचा प्रचार शुभारंभ सकाळी ९ वा. हत्तुर येथून सुरू होणार आहे. हत्तुर येथून ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर यांच्या आशीर्वाद घेऊन सुरू होणारी प्रचार रॅली दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गाव भेटींना प्राधान्य देत शेवट विजापूर नाका येथे करण्यात येणार आहे.
दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी, राजुर, बिरनाळ, औराद, संजवाड, नई जिंदगी, शेवट विजापूर नाका येथे होणार आहे. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी एक व्हिजन घेऊन संतोष पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ध्येय बाळगले आहे. उद्या सुरू होणाऱ्या प्रचार रॅली मधून विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांना सामोरे जात आहेत.
व्हिजन असणारा उमेदवार एक पर्याय..
सोलापूर शहर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी संतोष पवार यांनी विविध योजना अंतर्गत एक प्रकारचे पॉझिटिव व्हिजन घेऊन ते निवडणुकीच्या मैदानात सत्ताधारी व विरोधकांना आव्हान देणार आहेत.