दक्षिणच्या बापुंसमोर कडादींसह, शिवसेना, वंचित, प्रहार आणि अपक्ष यांचे तगडे आव्हान ! विकास कामे बापूंना तारणार का ?

दक्षिणच्या बापुंसमोर कडादींसह, शिवसेना, वंचित, प्रहार आणि अपक्ष यांचे तगडे आव्हान 

दोन टर्म मधील विकास कामे बापूंना तारणार का ?

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.४ नोव्हेंबर – सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात यंदा पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख, प्रमुख विरोधक उद्धव सेनेचे अमर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार, अपक्ष परंतु महाविकास आघाडी पुरस्कृत धर्मराज कडादीं आणि सोमेश्वर वैद्य यांच्यासह २५ जणांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात एकूण २५ उमेदवार निवडणुकीचे रिंगणात असणार आहेत.

   दरम्यान दक्षिणच्या राजकारणात गेल्या महिन्याभरापासून नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान आमदारांना शह देण्यासाठी विरोधी पक्षाने चंग बांधला, परंतु आपल्याच आघाडीत बिघाडी करून परस्पर उमेदवारी जाहीर केले, एबी फॉर्म दिला गेला. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या माजी आमदारांनी देखील निवडणूक लढवण्याचे ठाम केले. फॉर्म भरण्यासाठी मोठी फौज उभी केली. परंतु पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याने अपक्ष अर्ज भरावा लागेल. शेवटी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी माने यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत, महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.

दरम्यान दिलीप माने यांनी निवडणुकीतून मघार घेतल्याने सुभाष देशमुख यांना ही निवडणूक सोपी जाणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे, परंतु धर्मराज काडादी यांनी भाजपला आस्मान दाखवायचे ही खूनगाठ मनाशी बांधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना संगणक संच हे चिन्ह देण्यात आले आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी सिलेंडर घेऊन हत्तुर पासून आपल्या प्रचाराचा प्रारंभ करत आहे. दक्षिण तालुक्यातील विविध गावांमध्ये सत्ताधारी भाजप विरोधी वातावरण निर्माण करून, पाच वर्षातील लेखाजोखा मांडणार तसेच दुसऱ्या पक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी देखील आपला अर्ज कायम ठेवत सीसीटीव्ही कॅमेरा हे चिन्ह मिळवले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून सर्वांवर करडी नजर काळ्या बाजारावर प्रकाशित झोत टाकणार आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अमर पाटील यांना संधी.

महाविकास आघाडीमध्ये सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ही शिवसेनेची जागा असून त्यावर आमचा उमेदवार देणार आहे अशी भीमगर्जना करत संजय राऊत यांनी अमर पाटील यांना एबी फॉर्म दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली. अमर पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात लिंगायत मताची गोळा बेरीज करत निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. तरुण तडफदार शिवसेनेचा उमेदवार गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाबा मिस्त्री खेचणार किती मतं सर्वांचे लक्ष लागले..

तर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा दक्षिण विधानसभा निवडणूक लढवलेले काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांनी प्रहार पक्षात प्रवेश करत दक्षिण मध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाबा मिस्त्री यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत दक्षिण मध्ये चुरस आणखीन वाढवली आहे. गत विधानसभा निवडणुकीत ५० हजाराहून जास्त मते घेणारे बाबा मिस्त्री यंदा किती मते खेचणाऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *