रेल्वे इंजिनला एम.के.यांची मिळणार साथ ….!

मनसेला महादेव तारणार का ? धावत्या रेल्वे इंजिनला एम.के.यांची मिळणार साथ ….!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २२ ऑक्टोंबर – विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेतेमंडळी आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहेत सोलापूर शहरातील शहर उत्तरसह मध्य आणि शहर दक्षिण या तीनही विधानसभा मतदार संघासाठी अनेक इच्छुकांनी आपापल्या गॉडफादरकडे तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. सत्ताधारी भाजप पक्षातून सर्वप्रथम कामास सुरुवात केलेल्या महादेव कोगणुरे यांनी विविध सामाजिक कार्य करत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली परंतु भाजपने नवख्या  उमेदवारापेक्षा स्टॅंडिंग आमदारालाच प्राधान्य दिले.

हे कळल्यानंतर महादेव कोगणुरे यांनी काँग्रेसची वाट धरलीपर्यंत तेथे देखील पदरी निराशाच आली. परंतु विधानसभा लढवायची हे जिद्द ठेवून कोगनुरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत मनसेत प्रवेश केला.

 

 

मनसे मध्ये प्रवेश करताच सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एम.के. यांचा भाजप मधून सुरू झालेला प्रवास शेवटी रेल्वे इंजिन पर्यंत येऊन थांबला आहे. या निवडणुकीमध्ये एम.के चमत्कार घडवतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य …

सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड म्हणून कार्यरत असणारे एम.के. अर्थात महादेव कोगनुरे यांनी स्वतःच्या नावाची एम.के. फाउंडेशन संस्था निर्माण करत अनेकांना मदतीचा हात दिला आहे. जळीतग्रस्त कुटुंबीयांना मदत करत आर्थिक सामाजिक आणि भावनिक नाळ जुळवली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये त्यांचा एक चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सागर सिमेंट आणि एम.के.फाउंडेशन यांच्या माध्यमातून एम के सोलापुरात प्रसिद्धीस पावले आहेत. त्यांच्या या कार्याची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मिळेल दक्षिण मध्ये रेल्वेचे इंजिन धावेल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *