आ.सुभाष देशमुखांचा आपल्याच विरोधकांना सणसणीत टोला…! लगावला स्ट्रोक
अखेर भीमा-सीना नदीजोड प्रकल्पास मंजुरी ; आ.सुभाष देशमुख यांच्या ऐतिहासिक प्रयत्नांना यश…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि. ६ ऑक्टोंबर – भीमा-सीना जोडकालव्यास ०.५११ टीएमसी पाण्याची तरतूदीस शासनाने दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी मंजुरी दिली आहे. या जोडकालव्यामुळे सीना नदीवरील एकूण ५३ किमी लांबीच्या परिसरातील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. आ. सुभाष देशमुख यांनी या योजनेसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
पावसाळ्यात वडापूर येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीतून खालच्या भागात पावसाळ्यात पुरावेळी जवळपास ६० ते १०० टीएमसी पाणी वाहून जाते. वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधून हे पाणी बोगद्याद्वारे सीना नदीत सोडले जाणार आहे. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार असल्याने आता बारमाही सिंचनासाठी मिळणार आहे. भीमानदीवर वडापूर येथे बॅरेजसाठी दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून दुष्काळी भागातील शेतकर्यां साठी त्यांनी आपले कसब पणाला लावले आहे. वडापूर बॅरेज येथून जोडकाल्याद्वारे १४.४७ दशलक्ष घन मिटर इतके पाणी सीना नदीत येणार आहे. सीना नदीवरील नंदूर,वडकबाळ, सिंदखेड, बंदलगी, कोर्सेगाव व कुंडल येथे कोल्हापूर पध्दतीचे ६ बंधार्यात उजनी धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे.या जोडकालव्याची लांबी १८ किमी असून सीना नदीवरील कोल्हापूर बंधारा अकोले मंद्रूप ते कुडलसंगम पर्यंतचे अंतर ३५ किमीआहे.
या गावांना होणार फायदा या वाढीव ०.५११ टीएमसी पाण्यामुळे नंदूर, डोणगाव, तेलगाव, अकोले मंद्रुप, गुंजेगाव, पाथरी, वांगी, मनगोळी, वडकबाळ, वांगी, हत्तूर, समशापूर, सिंदखेड, बिरनाळ, चंद्रहाळ, होनमुर्गी, बंदलगी, औराद, राजूर, संजवाड, चिंचोली, कोर्सेगाव, कुमठा, केगाव, हत्तरसंग, बोळकवठा, कल्लकर्जाळ या बागायती क्षेत्र वाढणार आहे.
शेतकर्यांच्या विकासाला व उत्पन्नाला गती येणारःआ. देशमुख
सर्वांच्या सहकार्याने आणि पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्ण होत आहे. योजना लवकरच कार्यान्वीत होण्यासाठी आपण सर्वांना एकत्रीत येणे ही काळाची गरज आहे. या योजनेमुळे शेतकर्यांच्या विकासाला व उत्पन्नाला भविष्यात चांगलीच गती मिळणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.
बापूच्या रुपाने आम्हाला पुन्हा एकदा पृथ्वीवरती भगीरथ भेटले.
सीना नदीला कालव्याचा दर्जा मिळावा म्हणून गेली २५ वर्षे आम्ही मागणी करत होतो. परंतु बापूच्या रुपाने आम्हाला पुन्हा एकदा पृथ्वीवरती भगीरथ भेटले. आमच्या भावी पिढींचा कल्याण होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला हे भगीरथ वाटतात.
– संदीप टेळे,पंचायत समिती सदस्य, औराद.
पैसा कुठूनही उपलब्ध करता येतो. परंतु पाण्याची निर्मिती करता येत नाही.
जगामध्ये सध्या वाटल तेवढा आर्थिक पुरवठा होऊ शकतो. पैसा कुठूनही उपलब्ध करता येतो. परंतु पाण्याची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध करता येत नाही परंतु बापूंनी सर्व कसं पणाला लावून ताकद पणाला लावून आमच्या भागाला पाणी उपलब्ध करून दिलं आमच्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या समृद्ध होणार आहेत.
– दयानंद माने, आकोले मंद्रूप, प्रगतशील बागायतदार.