दक्षिण तालुक्याला सुजलाम सुफलाम करणार :- आ. सुभाष देशमुख

दक्षिण तालुक्याला सुजलाम सुफलाम करणार :- आ. सुभाष देशमुख !

विकासासाठी पुन्हा महायुतीला साथ देण्याचे आवाहन
दक्षिण तालुक्यातील विविध गावांना भेटी…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.८ नोव्हेंबर – दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. तालुक्यातील प्रत्येक गाव समृद्ध गाव करायचे आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. दक्षिण तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी महायुतीला सत्तेत आणावे असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

आ. सुभाष देशमुख यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ तालुक्यातील यत्नाळ, फताटेवाडी, शिरवळ, बोरूळ, बंकलगी, आहेरवाडी, सिंदखेड, मदे्र, घोडातांडा या गावाला भेट दिली. यावेळी आ. देशमुख यांचे प्रत्येक गावात स्वागत करण्यात आले. युवकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आ. देशमुख यांचे स्वागत करत ठरलंय यंदा बापू तिसर्‍यांदा असा जयघोष केला.

दरम्यान दक्षिण सोलापूरला जोडणारे राष्ट्रीय महामार्गासाठी ११३७ कोटींचा निधी दिला आहे. याशिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक, मूलभूत सुविधा, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायत बांधकाम २२७ कोटी, वडापूर बॅरेजेस ६७ कोटी, होटगी आदिवासी आश्रम शाळा व वसतिगृह बांधकाम ३२ कोटींचा निधी दिला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात असा निधी दिला आहे. गावात आणखी कामे करायची आहेत, त्यासाठी आपल्याला पुन्हा एकाद संधी द्यावी. तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असे देशमुख म्हणाले. यावेळी महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आ. देशमुख यांच्यासह शासनाचे अभिनंदन केले.

विविध योजना सुरू केल्याबद्दल शेतकर्‍यांनीही आ. सुभाष देशमुख यांना आर्शिवाद येत पाठिशी उभे राहण्याचे वचन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, माजी तालुकाध्यक्ष रामपा चिवडशेट्टी नामदेव पवार, अंबिका पाटील, अतुल गायकवाड, सरपंच जगन्नाथ गायकवाड, मल्लिकार्जुन चिवडशेट्टी, सरपंच सुनंदा वाघमोडे, उपसरपंच सुनील हिरापुरे, बाबय्या स्वामी, रमेश तोरूनगी,गणेश तळेकर,राजशेखर हिरापुरे, मल्लिकार्जुन कोनदे, केदार हिरापुरे, पाचलिंग अंबलगी, श्रीशैल कोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान फताटेवाडी येथे आ. देशमुख यांनी भेट देत कॉर्नर बैठक घेतली. यावेळी आ. देशमुख यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल ग्रामस्थांना माहिती सांगितले. सर्व योजना आपल्यापर्यंत पोहचल्याचे सांगत ग्रामस्थांनी आ. देशमुख यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.  यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, चनगोंडा हाविनाळे,रामप्पा चिवडशेट्टी, नामदेव पवार,अंबिका पाटील,अतुल गायकवाड,बसवराज पाटील,बसवराज बिराजदार,शिवानंद पुजारी,शिवानंद बिराजदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

धुबधुबी तलावात जलपूजन

आ.देशमुख यांच्या हस्ते धुबधुबी तलावात जलपूजन
नुकतेच धुबधुबी तलावामध्ये उजनी धरणाचे पाणी पोहोचले आहे. सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. ऐन गरजेच्या वेळी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी महायुती शासन व पाणीदार आमदार सुभाष देशमुख यांना धन्यवाद दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनीही आपली मागणी लगेच मान्य करून उजनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यापूर्वी तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवली. यापुढेही शेतकऱ्यांच्या हाकेला तत्पर धावून येणारे सरकार आपल्याला आणायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *