केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या सोलापुरात ; भव्यदिव्य सभेकडे लागले सर्वांचे लक्ष ; सुभाष बापूंसाठी वातावरण झाले पॉझिटिव्ह !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –
विधानसभा निवडणुकीचे वातावरणाचा चांगलेच तापू लागले आहे. सोलापूर शहरातील शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा उद्या सकाळी अकरा वाजता भंडारी मैदान जुळे सोलापूर येथे संपन्न होणार आहे. गडकरी यांच्या सभेमुळे सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वातावरण आता पॉझिटिव्ह झालेले दिसत आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी, प्रहारचे बाबा मिस्त्री, वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार, मनसेचे महादेव कोगनुरे, बाळासाहेब ठाकरे शिवसेना अमर पाटील, आपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य, हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी न देता, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणूक तितकीशी घासून होणार नाही. अशी चर्चा दक्षिण विधानसभा मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे. बाबा मिस्त्री यांनी गत विधानसभा निवडणुकीत जरी आपले अस्तित्व सिद्ध केले असले तरी, त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत प्रहारची बॅट हातात घेतलेली आहे. तर दुसरीकडे वंचित ने देखील गावोगावी गॅस सिलेंडरच्या माध्यमातून लोकांच्या घरात एक शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.

सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी देखील आपली सर्व यंत्रणा कामाला लावलेली आहे. नारीशक्तीच्या जोरावर त्यांनी कॉम्प्युटरच्या माध्यमातून नागरिकांशी कनेक्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य आणि युवराज राठोड यांनी देखील आपापल्या परीने निवडणुकीत कस लावलेला दिसत आहे. त्याच पद्धतीने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांनी देखील माजी मुख्यमंत्री विशेष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन दंड ठोकले आहेत. हे सर्व राजकीय गणित पाहता इतर उमेदवारांना मतांची गोळा बेरीज करण्यासाठी सर्वस्व झोकून द्यावे लागत आहे.

दरम्यान दक्षिण विधानसभा मतदारसंघात मूल्यबळ उमेदवार नसल्याने येथे काटे की टक्कर न होता निवडणूक वनवे होताना दिसत आहे. यापूर्वीच सुभाष देशमुख यांच्या विरोधात तितकासा सक्षम उमेदवार नसल्याने निवडणूक एकतर्फी होतेय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा होत असल्याने सर्वत्र पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेले आहे.

गडकरी यांच्या सभेकडे लागले सर्वांचे लक्ष…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कामासाठी प्रसिद्ध आहेत. रोडकरी अशी त्यांची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. नितीन गडकरी यांच्या साह्याने सुभाष देशमुख राज्याचे राजकारण करत असताना दिसतात. गडकरी यांच्या सभेमुळे सुभाष देशमुख यांच्यासाठी वातावरण चांगले निर्माण झाले आहे. त्यामुळे गडकरी सभेत काय बोलतील आणि कोणत्या विकास कामांची घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.