दिलीप माने वजनदार व्यक्तिमत्व ठरणार असल्याने शिंदे यांच्याकडून गेम झाल्याचे चर्चा….
शिंदे फॅमिलीने केला गेम ; नाराज माने मालक घेणार कठोर निर्णय ?
गत विधानसभा निवडणुकीत देखील केले सोयीस्कर राजकारण…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३० ऑक्टोंबर- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिक्षण संकुलाचे निर्माते दिलीप माने यांना या विधानसभा निवडणुकीत देखील दगाबाजीला सामोरे जावे लागले आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता माजी आमदार म्हणून कार्य केलेल्या दिलीप माने हे पुन्हा वरिष्ठ पातळीवरील राजकारणाचे बळी ठरले आहेत.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी आणि शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत नावे घोषित झाली, तसेच एबी फॉर्म दिला गेला. परंतु एका उमेदवाराकडे एबी फॉर्म स्वतः खासदार ताईंनी दिला परंतु दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म असताना देखील उमेदवाराला फार्मच दिला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता घामासान सुरू झाले आहे. दिलीप माने यांनी उघडपणे आपले नाराजी व्यक्त करत पुन्हा एकदा माझा गेम झाला आहे. माझ्याशी दगाफटका झाला आहे. आता अंतिम निर्णय घेणार आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शिंदे साहेब यांनी माझा वापर करून घेतला. या निवडणुकीत देखील असेच चित्र दिसत असताना, मी अपक्ष फॉर्म भरला आहे. ४ नोव्हेंबर तारीख ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून त्या दिवशी मी अंतिम निर्णय घेणार आहे. असे जाहीर करून माने मालक शिंदे फॅमिली विरोधात कठोर निर्णय घेण्याचे तयारीत आहेत.
दरम्यान गत विधानसभा निवडणुकीत देखील दिलीप माने यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक त्या ठिकाणी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महेश कोठे यांच्यात लढत होती. तेव्हा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हे महेश कोठे यांना एबी फॉर्म देणार होते. परंतु अचानक पणे हा फॉर्म दिलीप माने यांना दिला गेला आणि त्या ठिकाणी महेश कोठे यांचा पत्ता कट केला गेला. या निवडणुकीत देखील दिलीप माने यांनी महेश कोठे यांची मते खाल्ली त्यामुळे तेथे प्रणिती शिंदे यात हॅट्रिक करू शकल्या. तेव्हादेखील शिंदे फॅमिली ने दिलीप माने यांचा वापर करून घेतला. आज देखील तीच वेळ आली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील माने मालकांना आता तरी जागे व्हा वेळ निर्णय घ्या अशी भावनिक साथ घातली आहे. त्यामुळे स्वतः दिलीप माने यांनी आता वेगळा निर्णय घेणार असल्याचे मनोमनी ठरवले आहे.
शहराच्या राजकारणात दिलीप माने वजनदार व्यक्तिमत्व ठरणार असल्याने शिंदे यांच्याकडून गेम झाल्याचे चर्चा….
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अशा विविध क्षेत्रात कामगिरी करत माजी आमदार दिलीप माने यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कॉलेजेची स्थापना करून शिक्षणाची गंगा आणली आहे. त्याच पद्धतीने कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. पूर्वाश्रमीच्या आमदारकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. असे असले तरीही दिलीप माने हे शहराच्या राजकारणात वजनदार व्यक्तिमत्व होतील. त्यामुळे त्यांना कुठे ना कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न पक्षाअंतर्गत चालू आहे. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे.