प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचा झंजावात ; पदयात्रेने वेधले सर्वांचे लक्ष…

प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचा झंजावात ; संजय सरवदे यांच्या पदयात्रेने वेधले सर्वांचे लक्ष 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.७ डिसेंबर

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे संजय सरवदे यांनी आपल्या प्रभागात पदयात्रेच्या माध्यमातून एक वेगळा झंझावात निर्माण केला आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या प्रभाग एक मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण यंदा जोरदार चालणार आहे. असे चित्र निर्माण झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर संजय सरवदे यांनी दंड थोपाटले असून विरोधकांना आव्हानात्मक ठरणार आहे.

दरम्यान प्रभाग क्रमांक एक मधील मड्डी वस्ती, श्रीशैल नगर, सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी, स्टेट बँक कॉलनी क्रमांक दोन, धोत्री कर वस्ती अशा विविध नगरांमध्ये पदयात्रेचे माध्यमातून जनतेशी संपर्क साधला.यावेळी प्रभागातील आभार वृद्ध तसेच तरुणाई संजय सरवदे यांच्या कामावर समाधानी असल्याचे दिसून आले.

दरम्यान, संजय सरवदे यांनी कोणत्याही पद नसताना मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून प्रभागामध्ये विविध कामे तसेच सरकारी योजना लाभ नागरिकांना प्राप्त करून दिले आहेत. प्रभागाचा विकास करण्यासाठी तत्पर असणाऱ्या संजय सरवदे यांना जनतेचे पाठबळ मिळताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *