विरोधकांनी विकास काम काहीच काम केले नाही : त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दाच नाही – गणेश वानकर

विरोधकांनी विकास काम काहीच काम केले नाही : त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दाच नाही – गणेश वानकर

मतदारांचा आशीर्वाद घेताना गणेश वानकर 

प्रभाग क्रमांक ६ मध्ये गणेश वानकर यांच्या पदयात्रा ठरली लक्षवेधी ; महिलांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.७ डिसेंबर

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी नगरसेवक गणेश वानकर, सुनील कटके, सोनाली गायकवाड आणि गवळी यांनी प्रभागात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विविध प्रकारच्या सरकारी योजना जनते पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे येथील जनता सरकारवर आणि सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे दिसून येत आहे.

आमराई अवसे वस्ती आधी परिसरात नागरिकांनी पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आबाल वृद्ध महिलांचा आशीर्वाद घेतला. तसेच विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान विरोधकांना उत्तर देताना गणेश वानकर म्हणाले की, विरोधकांकडे आरोप करण्यासाठी कोणता मुद्दा शिल्लक नाही. त्यांनी विकास कामे केले नाहीत. त्यामुळेच आम्हाला बोलण्यासाठी जागा आहे. विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही केवळ विकास कामे आणि जनतेच्या एका हाकेसाठी आम्ही धावून येतो. असे सांगताना विविध सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत असे सांगितले.

प्रभागात केवळ विकास कामांनाच प्राधान्य दिलेले आहे. सरकारी योजना लाडकी बहीण योजना तसेच वयोवृद्धांसाठी पेन्शन योजना सुरू केली. त्यामुळे अनेक निराधाराना आधार मिळाला आहे. भविष्यात देखील या विविध योजना सुरू राहण्यासाठी आम्हाला साथ देण्याचे आवाहन सुनील कटके यांनी केले.

याप्रसंगी सुशिक्षित महिलांसाठी एकत्र येण्याचे आवाहन गवळी यांनी केले. महिलांसाठी विविध योजना राबवण्याचे मानस देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला. यावेळी आमराई, अवसे वस्ती, अशा विविध परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला.

दादा.. म्हणून चिमुकल्याने हाक मारल्यानंतर गणेश वानकर यांनी मायेन लेकराच्या डोक्यावरून हात फिरवताना..
थोरांच्या आशीर्वाद घेताना गणेश वानकर आणि इतर उमेदवार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *