आता स्वीकृत नगरसेवकांच्या हालचालींना वेग ; पराभूत उमेदवारांनी गाठले राधाश्री

स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय हालचालींना वेग, चढाओढ अन् उमेदवारांच्या नावांबाबत गुप्तता…

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.१७ जानेवारी

महापालिका निवडणूक निकालानंतर लगेच आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक न लढविणारे स्वीकृत नगरसेवक होऊन महापालिकेत शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

स्वीकृत सदस्यपदाच्या जागांसाठी जवळपास ४० ते ५० जण इच्छुक असल्याने या पदाच्या निवडणीच्या वेळी घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्वीकृत सदस्य पदाचा वापर केवळ कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठी,पालकमंत्री तसेच आपल्या आमदारांकडून आपापली फिल्डिंग लावली असून, कुणाचे पारडे जड होणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही पराभूत उमेदवारांनी तत्काळ आ. कोठेंची राधाश्री निवासस्थानी भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली. परंतु नगरसेवकांची नावे यापूर्वीच वर पाठवलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पराभूत झालेल्या किंवा नगरसेवक होऊ इच्छिणऱ्या उमेदवारांच्या पदरी निराशा पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *