शरद पवारांचे राष्ट्रवादी कार्यालय निघाले विक्रीला !
सोलापूर शहर राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद पडला का पथ्यावर ? राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण
शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी कालिका मंदिराजवळील एका गाळ्यात थाटले तात्पुरते ऑफिस
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.३ नोव्हेंबर
सोलापूर शहर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद ऊफाळून येत असल्याचे चित्र आहे. या वादातूनच आता नवीन घडामोड समोर येत आहे. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शरद पवार यांच्या बैठकीस अनुपस्थिती लावण्याने त्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी शहर कार्यालय रिकामे करणयास सांगितल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे. त्यामुळे महापौर बंगला रेल्वे लाईन येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय तात्पुरत्या काळासाठी कालिका मंदिर येथील एका गळ्यात स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसे पत्र देखील शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी काढले आहे. या नव्या घडामोडीं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अंतर्गत वादासाठी कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे.


दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीस सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधीर खराटमल यांनी स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवले. दस्तुरखुद शरद पवार यांच्या बैठकीला अध्यक्षांनी दांडी मारल्याने तसेच पूर्वाश्रमीच्या भाजपच्या कट्टर समर्थक असणाऱ्या महेश गाडेकर यांना आपला जवळचा कार्यकर्ता म्हणून बैठकीला पाठवल्याने राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना राग आला. यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील राजकारण चांगलेच तापले. याराजकारणावरून शहरा राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष विरुद्ध कार्यकर्ता असा कलगीतुरा पहावयास मिळाला.
या घटनेनंतर शरद पवार यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन या गोष्टीचा जाब विचारला. त्यानंतर खरटमल यांनी खुलासा करताना पक्षाने केव्हा पण बैठक घ्यावी. आणि आम्ही उपस्थित रहावे. त्यासाठी मी रिकामा नाही. त्याचवेळी गॅस एजन्सी कंपनीची बैठक होती. त्यामुळे महेश गाडेकर यांना मुंबई येथे पाठविले. महेश गाडेकर हा माझाच कार्यकर्ता असल्याचे सांगितले. मात्र पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला इतर पक्षातून राष्ट्रवादीत आलेल्या कार्यकर्त्याला पाठवणे योग्य आहे का ? असा सवाल पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याने राजकारण ढवळून निघत आहे. याच कारणातून हा प्रकार घडला असल्याचा कयास आता लावला जात आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयाला सोलापुरात नाही स्वतःच्या मालकीची जागा
दस्तूरखुद्द शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यालयाची स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने सोलापुरात चर्चेचा विषय बनला आहे. पूर्वाश्रमीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या नातेवाईकांच्या जागेत पक्ष कार्यालय थाटण्यात आले होते. भारत जाधव गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून शरद शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे शहराचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्याच्या जागेत कार्यालय चालायचे. मात्र भारत जाधव यांचे शहराध्यक्ष पद गेल्यानंतर मात्र पक्ष कार्यालय देखील गेले आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयावर लावण्यात आलेला बोर्ड देखील गुंडाळून ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
ती जागा माझी नाहीच.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय असलेली जागा पक्षाची नाही. ती जागा आमच्या मेव्हण्याची होती. त्यांच्या घरगुती अंतर्गत वादामुळे मेव्हण्याने जागेचा ताबा माझ्या नावाने केला होता. परंतु जेव्हा मी पदावरून उतार झालो. तेव्हा त्यांना जागा परत केली. तेव्हा खरटमल यांनी जागेचे भाडे देण्याचे मान्य केल्याने, सदरची जागा पुन्हा पक्ष कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र माझ्या परस्पर आमचे मेहुणे अशोक गायकवाड आणि युवराज राठोड यांच्यात जागेचा व्यवहार झाला. त्यांनी ती जागा राठोड यांना विकल्याने अचानक बांधकाम राठोड यांनी सुरू केले. ही बाब लक्षात आल्यानंतर खरटमल यांना सांगण्यात आले.
– भारत जाधव, प्रदेश उपाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट
तात्पुरत्या काळासाठी पक्ष कार्यालयाचे स्थलांतर
शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय भारत जाधव यांच्या नावाने आहे. ही जागा त्यांनी विकल्याने तात्पुरत्या काळासाठी कार्यालयाचे स्थलांतर कालिकादेवी मंदिर जवळील एका गाळ्यात केले आहे. लवकरच पक्षाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होईल.
– सुधीर खरटमल, शहराध्यक्ष शरद पवार राष्ट्र
वादी काँग्रेस पक्ष