सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दमदार कामगिरी ;
एका महिन्यात घरफोडीचे 35 गुन्हे उघडकीस आणत, 505 ग्रॅम सोन्याचे,1440 ग्रॅम चांदीचे दागिणे केले हस्तगत ;
1 पिकअप 4 मोटार सायकलीसह एकुण 36,24,950/- रू. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त केला
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि.९ जुलै :- पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांना बैठक घेवून जिल्हयामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण कडील 4 तपास पथकांनी जून 2024 या एकाच महिन्यामध्ये माला विषयी गुन्हे करणारे 6 आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करून 35 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये 505 ग्रॅम सोन्याचे दागिणे व 1440 ग्रॅम चांदीचे दागिणे,1 पिकअप व 3 मोटार सायकली एकुण 37,44,950/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अकलुज पोलीस ठाणे गुरंन 249/2024 भादंकि क. 454, 457, 38 सपोनि नागनाथ खुणे व पोलीस उप-निरीक्षक रविराज कांबळे यांचे पथक माला विषयी गुन्हयाचे शोध घेत असताना गोपनिय बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, अकलुज पोलीस ठाणे गुरंन 249/2024 भादंकि क. 454, 457, 380 या गुन्हयातील आरोपी हा सवतगव्हाण गावात आहे. सदर बातमी प्रमाणे सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक सवतगव्हाण येथे पोहोचले. बातमीतील आरोपीस पथकाने सापळा रचुन ताब्यात घेवून तपास करता सदरचा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केल्याची कबुली दिली. सपोनि/नागनाथ खुणे व त्यांचे पथकाने आरोपीताकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर आरोपी यांने त्याचे साथीदार समवेत सोलापूर ग्रामीण जिल्हयात खालील घरफोडीचे एकूण 14 गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.
दरम्यान सदरच्या आरोपीकडुन वरील गुन्हयातील 150 ग्रॅम सोेने व 50 ग्रॅम चांदीचे दागिणे व एक चारचाकी पिकअप असा एकुण 14,55,400/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरंन 48/2024 भादंवि क 457, 380 नुसार पोलीस उप-निरीक्षक-सुरज निंबाळकर, पोलीस उप-निरीक्षक-राजु डांगे व त्यांचे पथक अक्कलकोट उपविभागात पेट्रोलिंग करत असताना, बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरंन 48/2024 भादंवि क 457, 380 या गुन्हयातील आरोपी हा अक्कलकोट एस टी बस स्थानक येथे मोटार सायकवरून येणार आहे. सदर बातमी प्रमाणे सुरज निंबाळकर व त्यांचे पथक अक्कलकोट बस स्थानकावर पोहोचले. तेथे सापळा रचून बातमी प्रमाणे नमुद आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्या आरोपीने त्याचे साथीदार समवेत उपरोक्त गुन्हा व सोलापूर ग्रामीण जिल्हयात 12 घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे.या आरोपीकडुन वरील गुन्हयातील 75 ग्रॅम सोेन्याचे दागिणे व 3 मोटार सायकली असा एकुण 4,47,750/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं 249/2024 भादंवि कलम 380,454, 457 पोलीस उप-निरीक्षक-सुरज निंबाळकर, पोलीस उप-निरीक्षक-राजु डांगे व त्यांचे पथक मंगळवेढा उपविभागात असताना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं 249/2024 भादंवि कलम 380,454, 457 या गुन्हयातील आरोपी हा पंढरपूर बस स्थानकासमोर फिरत आहे.
सदर बातमीच्या अनुशंगाने पंढरपूर बस स्थानकावर पोहोचलो. बातमी प्रमाणे आरोपी यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सपाळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करता आरोपीत याने त्याचे साथीदार समवेत सोलापूर ग्रामीण जिल्हयात 6 घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. आरोपीकडुन वरील गुन्हयातील 100 ग्रॅम सोेने दागिणे असा एकुण 7,56,000/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कुर्डुवाडी पोलीस ठाणे गुरनं 61/2024 भादंवि कलम 380, 457 पोलीस उप-निरीक्षक, सुबोध जमदाडे यांना पथकास करमाळा उपविभागात मालाविशयी गुन्हयाच्या संदर्भाने बातमी मिळाली होती. बातमीनुसार कुर्डुवाडी पोलीस ठाणे गुरनं 61/2024 भादंवि कलम 380, 457 यागुन्हयातील आरोपी हा करमाळा नगर बायपास रोडवर थांबला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली झाली.
त्यानुसार पोलीस उप-निरीक्षक, सुबोध जमदाडे, सुरज निंबाळकर, राजु डांगे व त्यांचे पोलीस पथक नमुद बातमीतील ठिकाणी पोहोचले. तेथे थांबून आरोपी सदर ठिकाणी आला असता आरोपीस सापाळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्याने त्याचे साथीदार समवेत सोलापूर ग्रामीण जिल्हयात 5 घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. ते पुढीलप्रमाणे. आरोपीत याचेकडुन वरील गुन्हयातील 150 ग्रॅम सोेने व 1390 ग्रॅम चांदीचे दागिणे असा एकुण 9,05,800/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. करकंब पोलीस ठाणे गुरंन 123/2024 भादंकि क 454, 380 सपोनि/ शशिकांत शेळके पोलीस उप-निरीक्षक, सुबोध जमदाडे व त्यांचे पथकाने करकंब पोलीस ठाणे गुरंन 123/2024 भादंकि क 454, 380 या गुन्हयातील आरोपी याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीत यांचेकडुन गुन्हयातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे किंमत 1,80,000/- रू. किंमतीचे मुद्देमाल हस्तगत केले आहेत. करमाळा पोलीस ठाणे गुरंन 841/2023 भादंकि क 395 तसेच सपोनि/ शशिकांत शेळके, व पोलीस उप-निरीक्षक, सुबोध जमदाडे व त्यांचे पथकाने करमाळा पोलीस ठाणे गुरंन 841/2023 भादंकि क 395 या गुन्हयातील पाहिजे आरोपी करमाळा बस स्टॅन्डवर ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारा सोबत केल्याचे कबुली दिली. तसेच करमाळा पोलीस ठाणे गुरंन 840/2024 भादंवि क 380, 457 हा गुन्हा देखील साथीदारा सोबत केल्याचे कबुली दिली. सदर गुन्हयातील सोन्याचे दागिणे विकत घेणारे सोनार याला देखील नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरचा आरोपी हा सराईत असुन आरोपीत याचे गुन्हे अभिलेख पाहता आजतागायत सोलापूर ग्रामीण जिल्हयात 06, अहमदनगर जिल्हयात 10, बिड जिल्हयातील 4, पुणे ग्रामीण जिल्हयात 3 असे दरोडा, घरफोडी चोरी या सारखे एकुण 23 गुन्हे दाखल आहे.
दरम्यान मागील जुन 2024 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचे एकुण 35 गुन्हे उघडकीस आणुन त्या गुन्हयातील एकुण 505 ग्रॅम सोन्याचे दागिणे व 1440 ग्रॅम चांदीचे दागिणे, 1 पिकअप व 3 मोटार सायकली, एकुण 36,24,950/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.*
*तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी जून 2023 ते जून 2024 या 1 वर्षाच्या कालावधीत 143 गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये 332 तोळे किंमत रूपये 1,43,44,841/- चे जप्त केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक, शशिकांत शेळके, नागनाथ खुणे, पोलीस उप-निरीक्षक, सुबोध जमदाडे, सुरज निंबाळकर,रविराज कांबळे, राजु डांगे, श्रेणी पोउपनि/ राजेश गायकवाड, सपोफौ/ शिवाजी घोळवे,ख्वाजा मुजावर,श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, पोहेकॉ/धनाजी गाडे, परशुराम षिंदे, प्रकाश कारटकर, सलीम बागवान, विजयकुमार भरले, मोहन मनसावाले, रवि माने, पोना/धनराज गायकवाड, पोकॉ/ अजय वाघमारे, अक्षय दळवी, अन्वर अत्तार,विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, अक्षय डोंगरे, यश देवकते,चापोना/समीर शेख, चापोकॉ/सतीश बुरकुल, राहुल माने, अशोक हलसंगी, लक्ष्मीकांत देडे, सपोफौ/ श्रीकांत निकम, पोह विक्रम घाटगे यांनी बजावली.