सराईत मोटार सायकल चोरास सांगोल्यात ठोकल्या बेड्या !
६ लाख ९० हजाराच्या १५ मोटारसायकली जप्त ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात मोटारसायकलीच्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर याचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेऊन मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीकारी आणि अंमलदारांचे वेग वेगळे पथके तयार करुन मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जिल्ह्यात पथके रवाना केली.

याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांना तपासाच्या टप्प्यावर गुन्हे शाखेच्या सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकास पंढरपुर शहरात रेकॉर्डवरील मोटारसायकल चोर नामदेव बबन चुनाडे याने खडतरे गल्ली सांगोला येथे मोटार सायकल चोरली आहे. तसेच त्याने अनेक मोटार सायकली चोरल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्याच धागेदोऱ्याच्या त्या अनुषंगाने सहा.निरीक्षक शिंदे व त्यांचे पथकाने सापळा रचून संशयित आरोपी नामदेव बबन चुनाडे ( रा. अनिल नगर, कराडकर मठा शेजारी पंढरपुर) यास पंढरपूर येथून ताब्यात घेतले. चुनाडे याला अटक केल्यानंतर चोरीच्या मोटारसायकली चोरीबाबत त्याला माहिती विचारली असता तो उडवा उडवीचे उत्तर देवु लागला. मात्र पोलिसी खाक्यासमोर त्याने सांगोला पोलीस ठाण्यात बीएनएस-२३ चे क ३०३ (२) यागुन्हयातील मोटारसायकल खडतरे गल्ली सांगोला येथुन चोरी केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक, प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहा पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पथकातील अंमलदार ग्रेड उप निरीक्षक श्रीकांत गायकवाड, हवालदार रवि माने, सलीम बागवान, विजयकुमार भरले, धनराज गायकवाड, महिला हवालदार अश्विनी गोटे, कॉन्स्टेबल विनायक घोरपडे, सुरज रामगुडे, मनोज राठोड, अनवर अत्तार, चालक कॉन्स्टेबल सतीश बुरकुल यांनी बाजवली आहे.
संशयित आरोपी नामदेव बबन चुनाडे याच्याकडे आणखीन सखोल चौकशी केली असता, त्याने सांगोला, करमाळा, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यातून देखील मोटार सायकली चोरल्याचे सांगितले. एकूण ६ लाख ९० हजाराच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या मोटारसायकली बाबत गुन्हे अभीलेख पडताळणीत विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.