सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस हडपसर येथे थांबा द्या –
रेल्वे सल्लागार समिती सदस्य गणेश डोंगरे यांची मागणी…
प्रतिनिधी सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.५ जून
मुंबई येथे १२६ व्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामशदात्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक पार पडली.
दरम्यान, या बैठकीत मध्य रेल्वेच्या विविध विषयांसंबंधी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सोलापूरचे मध्य रेल्वे सल्लागार समितीचे नवनिर्वाचित सदस्य गणेश डोंगरे यांनी सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस बाबत निवेदन सादर केले. ते म्हणाले, हुतात्मा एक्सप्रेस सकाळी (६.३०) वाजता सोलापूरहून पुण्याला जाते. या गाडीला हडपसर येथे थांबा द्यावा. जेणे करून सोलापुरातून हडपसर येथे कार्यरत असणाऱ्या अनेक युवक, युवती व महिलांना सहाय्यक ठरणार आहे.
दरम्यान, सोलापुरातील अनेक युवक युवती या कामानिमित्त सोलापूर ते पुणे ये जा करतात. हडपसर या परिसरात विविध आयटी कंपनी मोठया प्रमाणात आहे. हडपसर रेल्वे स्टेशनला न थांबता रेल्वेगाडी पुणेला जाते. पुणेरेल्वे स्टेशन वरून हडपसर येथे कंपनीला जाताना वाहतूक कोंडीमुळे दोन तास जातात. त्यामुळे चाकरमान्यांना त्रास होत आहेत. सोलापूरातील नोकरी निमित्त जाणाऱ्या प्रवाशांचे हित लक्ष्यात घेता हडपसरला थांबा मिळवा मागणी केली. यावर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिल्याचे गणेश डोंगरे यांनी सांगितले.