श्रीनिवास संगा यांच्या वाहनाचा भीषण अपघात ; सुदैवाने कोणतिही जीवित हानी नाही ; सोलापुर – पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच…

रस्ते कॉन्ट्रक्टरच्या हलगर्जीपणा मुळे ; सोलापुर – पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच…

पद्मशाली समाजाचे नेते श्रीनिवास संगा यांच्या वाहनाचा भीषण अपघात ; सुदैवाने कोणतिही जीवित हानी नाही….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२२ मे

अखिल भारत पद्मशाली युवजन संगम राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे युवा नेता श्रीनिवास संगा हे MH 13 EF 1313 या फॉर्च्यूनर चार चाकी वाहनातुन मंगळवारी मुंबई वरुन सोलापुरला येत असताना रात्री पावने एक वाजण्याच्या सुमारास सोलापुर – पुणे महामार्गावर चिखली या गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की चार चाकी वाहनाचे चेंदामेंदा झाले आहे, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही, भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा हे किरकोळ जखमी झाले आहेत ; एवढेचं नव्हे तर त्यांच ठिकाणी त्यांच वेळी स्विप्ट डिजायर या वाहनाचा सुध्दा अपघात झाला सुदैवाने त्या अपघातामध्ये सुध्दा कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

गेल्या अनेक दिवसापासुन सोलापुर – पुणे महामार्गावर रस्त्याचे काम चालु असुन या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाय योजना, रस्ते कामाचे बोर्ड लावणे आवश्यक असताना सुद्धा लावले नसल्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसापासुन या ठिकाणी अनेक अपघात झाले असुन या अपघाताला सर्वेस्व जबाबदार रस्ते कॉन्ट्रक्टरचं असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अपघात वाहनधारकाची आहे ; एकीकडे केंद्रसरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोट्यावधी निधी खर्च करून उपाय योजना जनजागृती करत असताना मात्र दुसरी कडे रस्ते कॉन्ट्रक्टरच्या हलगर्जीपणा मुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *