प्रभाग एक मधील नागरिकांचा महापालिका प्रशासना विरोधात एल्गार…!
मुलभूत सोई सुविधाचा अभावामुळे त्रस्त नागरिकांनी काढला महापालिकेवर मोर्चा…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२ जून
सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे सांडपाण्याचे ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाण्याचे पाईप लाईन, रस्ते, दिवाबत्ती आदी मुलभूत सोई सुविधांपासून गेली अनेक वर्ष वंचित आहे. या संबंधी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही. विकास कामाच्या निविदा देखील निघाल्या आहेत. तरी प्रत्यक्षात काम होत नाही. महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी चालढकल करत आहेत. विकासापासून वंचित राहिलेल्या या भागातील नागरिकांनी अखेर वैतागून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्या मार्फत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारा विरोधात चार हुतात्मा चौक ते सोलापूर महापालिकेवर धिक्कार असो…. धिक्कार असो….ढिम्म महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो या घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी एक प्रभाग मधील समस्याचा पाढा वाचुन दाखवला. अनेक वर्षांपासून येथील नागरिक नागरी सुविधापासून वंचित आहेत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही. म्हणून मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात महायुतीची सत्ता आहे. सत्ताअसून देखील प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मुलभूत सोयी सुविधांसाठी मोर्चा काढावा लागतो. विकास कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणारे अधिकारी यांच्यामुळे होत असल्याचा आरोप केला.
याप्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , शहर सचिव दत्तात्रय बनसोडे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, प्रज्ञासागर गायकवाड , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे,कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर विजयानंद काळे,रमेश कांबळे,सिद्धार्थ सोनवणे,आनंद इगंळे,दत्ता सोनवणे. आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.