माजी नगरसेविका सुनीता रोटे यांच्या भरघोस कामाला जनतेतून मिळतोय पाठिंबा…बदल

प्रभाग क्रमांक २३ मध्ये होते विकासात्मक बदल ; माजी नगरसेविका सुनीता रोटे यांच्या भरघोस कामाला जनतेतून मिळतोय पाठिंबा..

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.११ डिसेंबर 

सोलापूर शहरातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका तथा महिला आघाडीचे अध्यक्ष सुनीता रोटे यांनी गत दोन टर्म निवडणुकीच्या काळात प्रभाग क्रमांक २३ मधील विविध नगरांमध्ये ठोस आणि भरीव विकास कामांच्या मदतीने जनतेच्या मनावर छाप उमटवली आहे. पहिल्या टर्ममध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी दुसऱ्यांदा महापालिकेत स्थान मिळवले आहे. कायम सेवेत तत्पर असणाऱ्या रोटे दाम्पत्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील रोटे जनतेच्या मनावर गारुड फिरवत असल्याचे दिसत आहेत. प्रभागातील विविध नगरात विकास कामांसाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणला. त्यामध्ये रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छता, जलवाहिनी, ड्रेनेज लाईन, यांसारखे विविध विकास कामांचा समावेश होतो. कोरोना काळात देखील प्रभागाच्या नगरसेविका म्हणून प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तितक्याच तत्पर त्या दिसून आल्या.

दरम्यान, प्रभागातील प्रत्येक कार्यात ते स्वतः सहभागी असतात. प्रभागातील लक्ष्मी विष्णू चाळ येथून नागोबा मंदिर ते साठे वस्ती ते सलगर वस्तीपर्यंत १२ इंची पिण्याचे एक्सप्रेस लाईन सुमारे दीड किलोमीटर पाईपलाईन कोट ते सव्वा कोटी रुपये निधीचे काम नगरसेविका रोटे सुनिता यांच्या प्रयत्नाने पूर्ण करण्यात आले.

सुरू असलेल्या कामाची पाहणी करून दर्जा आणि उत्कृष्टता टिकून काम सुरू आहे का नाही याची पाहणी करून नागरिकांना आशस्वस्थ करतात. त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक २३ मधील पापा राम नगर मधील अंतर्गत डांबरी व काँक्रीटचे रस्ते पूर्ण काम झाल्यानंतर रस्त्याची पाहणी करून ठेकेदारांना आणि मक्तेदारांना उत्कृष्ट आणि दर्जेदार काम करण्याचा सल्ला देखील यावेळी माजी नगरसेविका सुनीता रोटे यांनी स्वतःहून जातीने लक्ष घालून दिला. त्याच प्रमाणे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे त्यांच्या हस्ते सुमारे ३ कोटी रुपयांच्या ड्रेनेजचे काम पूर्णत्वास नेले. कोरोना काळात देखील जनतेच्या सेवेसाठी त्यात तत्पर राहिल्या. त्यामुळेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी पुन्हा एकदा रोटे दांपत्यावर विश्वास टाकल्याचे पहावयास मिळत आहेत.

देशाचे नेते मा. खा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडिच्या वतीने हा कार्यक्रम प्रभागात संपन्न होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात रोटे दांपत्याकडून करण्यात आले आहे.”असे म्हणतात यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो; परंतु येथे यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात असल्याचे चित्र दिसून येत आहे…एवढे मात्र नक्की”

 

 

देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा… 

शुभेच्छुक :- माजी नगरसेविका सुनीता दादाराव रोटे समस्त प्रभाग क्रमांक २३ मधील नागरिक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *