१२०० कोटी निधी घेणाऱ्यांनी शहर विकासाचे बोलू नये – कोठे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा घणाघात.
३५ वर्षे महापालिका ओरबडून खाणाऱ्यांना २० वर्षाचा हिशोब विचारण्याचा अधिकार नाही :- चंदनशिवे
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१० नोव्हेंबर – देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी उजनी येथून पाईपलाईन आणून पन्नास वर्षे सोलापूर वर अधिराज्य गाजवलं. आमदार देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुहेरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सत्ता मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी सात वर्षात हजारो कोटींचा निधी यासाठी आणला. दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी ३५ वर्ष ज्यांनी वापरला ज्यांनी महापालिका ओरबाडून खाल्ली असा सवाल कोठे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी व्यापारी मेळाव्यात उपस्थित केला.
पुढे बोलताना चंदनशिवे म्हणाले की शहर उत्तर मध्ये भाजपची विचारधारा असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमदार देशमुख हे विक्रमी मतांनी निवडून येतील. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी मध्ये मालक शपथ घेतील हे आम्हाला पाहायच आहे. शहरातील व्यापाऱ्यांना हवे तेव्हा पाहिजे ती मदत मालकांनी वेळोवेळी केली आहे. वेळप्रसंगी कामात हायगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास ही सांगितले. मागील पंधरा वर्षापासून मी महानगरपालिकेच्या सभागृहात साक्षीदार आहे. देशमुख मालकांनी भाजपची सत्ता आल्यावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून सांगितले जनतेसाठी काम करा, कोणतेही चुकीच्या कामांना पाठीशी घालू नका. पैशाच्या मोहात पडू नका चांगले काम करा नाव कमवा. मी तुम्हाला पैसे देतो. स्टॅंडिंग सभागृह महापौर पदाच्या कार्यकाळात कोणतेही आर्थिक विषयाच्या मागे लागू नका असा सांगणारा आमदार मी जवळून पाहिला आहे. टक्केवारी न घेणारा आमदार म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.मागील २० वर्षात २५ हजार पेक्षा अधिक रुग्णांवर हृदयाचे ऑपरेशन कॅन्सरच्या उपचारासाठी आणि डोळ्यांचे ऑपरेशन मालकांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत घडवून आणले..
मेळाव्यामध्ये मनोगत व्यक्त करताना आमदार देशमुख म्हणाले की पुढील पाच वर्षात सम्राट चौक परिसराला छत्रपती संभाजी महाराज चौकाप्रमाणे सुशोभीकरण करू या भागातील राहिलेल्या नागरिक समस्यांची पूर्तता करू. स्मार्ट सिटी मुळे अनेक चांगली कामेही झाली आहेत. सोलापूरच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हजार कोटीचा निधी आणला आणि आता ते काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होईल. पक्षाने मला पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे तुम्ही सर्व जनता माझ्या पाठीशी असल्याने ही संधी मला पुन्हा मिळाली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे तुमची साथ अशीच राहू द्या राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी आपण आम्हाला मतदान करावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास शहरातील व्यापारी वर्ग रेडीमेड कारखानदार कापड व्यापारी टेक्सटाईल व्यापारी इत्यादी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.