गेले ते कावळे राहिले ते मावळे – आ.विजयकुमार देशमुख
पक्षाने एवढं देऊनही अन्याय झालं म्हणून ओरडणाऱ्यांना जागा दाखवा : राजकुमार पाटील
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –
गेले ते कावळे राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी अनेक पदे देऊनही पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडणार नाही. मी आमदार व्हायच्या आधीपासून घोंगडे वस्ती हा भाजपचा बालेकिल्ला आहे लोकसभा विधानसभा महापालिकेला इथले मतदार हे भाजपच्याच मागे राहतात, असे विधान महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी सायंकाळी घोंगडे वस्ती येथील कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केले.

पुढे ते म्हणाले, देशभरात जेव्हा भाजपच्या विरोधात अपप्रचार चालू होता त्यावेळेस शहर उत्तर मधील जनतेने भाजपवर विश्वास ठेवून ३६ हजार रुपये मतांचे लीड दिला. भवानी पेठ घोंगडे वस्ती हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभा विधानसभा आणि महापालिकेला येथील मतदार भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देत आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचण्याचा काम भाजपच्या वतीने चालू आहे. अन्नपूर्णा योजना, उज्वला गॅस योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, स्मार्ट सिटी योजनेतून शहरात झालेल्या हजारो कोटींचे काम, महिलांसाठी सोलापूर शहरात स्वतंत्र हॉस्पिटल आणि राज्य सरकारची लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातल्या प्रत्येक गृहिणींना आर्थिक मदत होत आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजनेतील महिलांना २१०० रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केले.

पक्षाने या भागातील माजी नगरसेवकाला २५ वर्षांमध्ये अनेक पद दिलीत. पाच वेळा नगरसेवक पदाचा तिकीट, दोन वेळा विरोधी पक्षनेता, महानगरपालिकेचा सभागृह नेतेपद, जिल्हा नियोजन मंडळ, स्थायी समिती सभापती, यासह अनेक पदे देऊन पार्टीने काही दिलं नाही म्हणून पक्षाच्या नावानं गळा काढणाऱ्या व्यक्तींना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या भागातील लोकांच्या जीवावर चुकीचं राजकारण करून कायम दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींना घरी बसवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे नाव न घेता राजकुमार पाटील यांनी केली.प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत. आमदार विजयकुमार देशमुख अनवर या भागातील नागरिक मनापासून प्रेम करतात. निवडून आल्यावर याहून मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ असे माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सिद्राम जाडगल, विजय पुजारी, मल्लिनाथ चोपडे, सुरेश जमादार, महेश कोळकर, सुरेश पाटील, जिंदा गंजली, उमेश जमादार, आनंद गुजले, सोमनाथ बिराजदार, वीरेश मंधकल, नागेश पुजारी, चंद्रकांत मेटी, बालाजी बोड्याल, रवी कावळे, पप्पू जोशी, प्रभाकर ज्याडगळ, जुनेद तांबोळी, हिशोब इनामदार, श्रीनिवास ,इस्माईल शेख, श्रीकांत जिट्टा, मल्लेश पुजारी, मढी मार्चला, रवी कोळी, सुदीप मेटे, गणेश कामूर्ती, गुरु आलुरे,अंबादास भाईकट्टी, याकुब शेख, चंद्रकांत गंदाळ, लिंबाजी शहापूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गदगे यांनी तर आभार दत्ता बडगु यांनी मानले.
