शहराचा चेहरा मोहरा बदलणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही ; शहराच्या विकासाचे किसन जाधव यांनी घातले साकडे…

सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२४ मार्च

महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध तसेच नागरिकांना अन्य मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी शहर विकास आराखडा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी भेट घेत शहराच्या विकास आराखड्याचा मुद्दा मांडला…

        दरम्यान, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीत सोलापूर शहराचा विकासाच्या दृष्टीने तरतूद करून विविध विकास कामांसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहोचावा. माहयुती सरकारच्या माध्यमातून घेतलेले लोककल्याण्यार्थ निर्णय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा अश्या सूचना देखील यावेळी पवार यांनी दिल्या असल्याचे किसन जाधव यांनी सांगितले.

     याप्रसंगी बारामती जिल्हा परिषद सदस्य कुलदीप तावरे, राष्ट्रवादी शहर संघटक ऋषी येवले, माणिक कांबळे, महादेव राठोड, हुलगप्पा शासम, दीपक आरगेल आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *