- डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ, आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन जाधव..solapur-ncp-leader-kishan-jadhav
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ५ ऑगस्ट – राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या.
दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, सदस्य चरणराज चवरे आणि मनीष काळजे यांच्यामध्ये जोरदार विवाद झाला. या दरम्यान आ.यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चवरे आणि काळजेंना यांना धारेवर धरले. अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले.
यावेळी पालकमंत्री यांनी यावर तोडगा काढत शेवटी विषय मार्गी लावला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी रामवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील समस्या मांडल्या येथील प्रसुती गृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे.जीएनएम, एएनएम कर्मचारी प्रसुती करतात. तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. याशिवाय या ठिकाणी शौचालय नाही, सीसीटीव्ही बंद आहेत. ऑपरेशन थेटर आहे पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात येतात अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीमध्ये त्यांनी मांडल्या.
यावर तात्काळ पालकमंत्र्यांनी आचारसंहिते पूर्वी ही शेवटची बैठक असल्याने पालकमंत्र्यांनी समस्या मार्गे लागण्या विषयी तत्काळ प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती देखील किसन जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे केली. रामवाडी आरोग्य केंद्राच्या गंभीर समस्या बाबत महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी आपण तत्काळ लक्ष घालू आणि समस्या दूर करू अशी ग्वाही दिली. दरम्यान जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्तीनंतरच जाधव यांची पहिलीच बैठक गाजवली आणि आक्रमक होत आपल्या समस्या त्यांनी मांडल्याचे दिसून आले.