मुसळधार पावसामुळे प्रभाग २२ मध्ये जनजीवन विस्कळीत.. नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क रहावे.. प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वोपतरी तत्काळ मदत मिळावी-किसन जाधव

सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने हाहाकार माजवला असून, मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक भागांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत.

दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथील एसएलबी रिक्षा स्टॉप, गोली वडापाव, उदय विकास प्रशाला, यतीमखाना, रामवाडी धोंडीबा वस्ती, मोठी इरण्णा वस्ती, गैबी पीर नगर, सनत नगर परिसरात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक ६ चे विभागीय अधिकारी पानगल, मंडल अधिकारी भीमाशंकर बुरले, ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे, देवकर, इलाई शेख, शिराज रजाक वकील शेख, पप्पू शेख, शिराज शेख, सिकंदर शेख, इरफान शेख,पवन खांडेकर, स्वप्नील आठवले, फिरोज पठाण, सिद्धू गायकवाड, दिनेश चलवादी, मनोज चलवादी, चंद्रकांत चालवादी, प्रमिला स्वामी, प्रमिला बिराजदार, समद मिस्तरी, शेख लियाकत, बक्सू मामा शेख, पप्पू शेख, एजाज शेख, जब्बार पटेल, काशिनाथ वनकोळे, लल्ला जाधव, सत्तार चाचा पटेल, जाकीर शेख, रमेश चलवादी, राजू बेळेनवरू, हारुण शेख, वसंत कांबळे, महादेव राठोड आनंद गाडेकरयांच्या समवेत आपातकालीन परिस्थितीची पाहणी केली.


यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओंबासे, अतिरिक्त उपायुक्त रवी पवार, संदीप कारंजे, नगर अभियंता सौ.सारिका अकुलवार, सोलापूर महानगरपालिका आपातकालीन विभाग व जिल्हा आपातकालीन विभाग यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून प्रभाग क्रमांक २२ येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माहिती देऊन तत्काळ येथील नागरिकांना आर्थिक मदत अथवा बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात आणि या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी अशी मागणी देखील किसन जाधव यांनी यावेळी केली.