सोलापूर शहरातील रस्त्यावर उघड्यावर राहणारे बेघर व्यक्तीसाठी शोध मोहीम सुरू ; थंडी पासून बचाव होण्यासाठी महापालिकेचा पुढाकार…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ डिसेंबर
सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर व्यक्तीसाठी बेघर निवारा केंद्र कुमठा नाका क्रीडा संकुल मागे सोलापूर आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलाणी साहेब यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार थंडी मुळे कोणत्याही बेघर व्यक्ति ला त्रास होऊ नये त्यांची थंडी पासून बचाव वहावा या करिता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
दरम्यान, सोलापूर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना कळविण्यात येत आहे की, शहर स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने व शहरातील वाढत्या थंडीमुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेकरी, घर सोडून आलेले वृद्ध महिला पुरुष लहान मुले अशा प्रकारचे लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात व रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर येथे थंडी पासून बचाव करण्यासाठी राहण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा सर्व लोकांना रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहे