शहराचे हॉटस्पॉट ठरलेले प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेनेच्या अमोल बापूंचे शक्तिप्रदर्शन… भव्य पदयात्रातून वेधले लक्ष.

सोलापूर महापालिकेच्या धुरळा ;

प्रभाग ७ मधील शिवसेना एकनाथ शिंदे गटाची भव्य पदयात्रा 

सोलापूर व्हिजन न्युज, 

सोलापूर, दि.२८ डिसेंबर

सोलापूर महापालिका निवडणुकीचा धुराळा सुरू झाला असून, शहराच्या हॉटस्पॉट्स ठरलेल्या प्रभाग क्रमांक ७ येथील क्रांती तालीमपासून सुरू झालेली शिवसेना एकनाथ शिंदे गटाची भव्य पायी रॅली यश नगर व अवंती नगर मार्गे काढण्यात आली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या रॅलीचा समारोप पुन्हा क्रांती तालीम येथे करण्यात आला.

भव्य पदयात्रातून वेधले लक्ष

रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार अमोल बापू शिंदे, अनिकेत पिसे, ज्ञानेश्वर सपाटे, सौ. मनोरमा ताई सपाटे, माजी नगरसेविका रेखा सपाटे, संकेत पिसे, प्रकाश अवस्थी यांच्यासह परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलांचा वाढता सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.

 

मार्गक्रमणा दरम्यान कार्यकर्ते व नागरिकांनी घोषणांच्या माध्यमातून पक्षाच्या धोरणांना पाठिंबा दर्शवला. स्थानिक विकासकामांवर विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या सहकार्यामुळे रॅली शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पडली.

 

समारोपावेळी उमेदवारांनी उपस्थितांना संबोधित करत भविष्यातील विकास योजनांची माहिती दिली. या रॅलीमुळे प्रभाग सातमधील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे जनसमर्थन वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *