महापालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात….
तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा दौड तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन…
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १३ ऑगस्ट – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा अभियानाला 9 ऑगस्ट, 2024 सुरुवात झाली असून सोलापूर महापालिकेच्या वतीने अभियाना अंतर्गत दिनांक 9 ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा दौड,आणि तिरंगा मॅरेथॉन तसेच तिरंगा संस्कृती कार्यक्रम, तसेच तिरंगा प्रतिज्ञा,तिरंगा सेल्फी इत्यादी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सोलापूर महापालिकेच्या वतीने इंद्रभवन इमारत तसेच बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवी पेठ येथील प्राथमिक शिक्षण मंडळ या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या मध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग राहणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते तिरंगा कॅनव्हास व तिरंगा सेल्फी चे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप,उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलांणी, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक नगररचना संचालक मनीष भिश्नुरकर, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे आदी अधिकाऱ्यांनी सुद्धा यावेळी सेल्फी काढली. यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, खाते प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त यांचे आवाहन……
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2024 हर घर तिरंगा ‘ अभियान राबविण्यात येत असून या अभियानामध्ये स्वातंत्र्य सैनिक, हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबिय,लोकप्रतिनिधी,माजी नगरसेवक, सामाजिक संघटना, संस्था तसेच सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा व 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरांवर या दिवशी तिरंगा फडकावण्यात यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.