सोलापूर‎ महापालिका‎ बजेट‎ सादर;‎ प्रशासनाच्या‎ त्रुटींवर‎ किसन जाधव‎ यांची‎ मांडणी, पाणीप्रश्नावरही‎ भूमिका‎ स्पष्ट

सोलापूर‎ महापालिका‎ बजेट‎ सादर;‎ प्रशासनाच्या‎ त्रुटींवर‎ किसन जाधव‎ यांची‎ मांडणी, पाणीप्रश्नावरही‎ भूमिका‎ स्पष्ट

नागरिकाभिमुख सर्वसमावेशक‎ सोलापूरच्या प्रगतीसाठी‎ महत्त्वाचे बजेट;‎ विकासाला‎ नवी‎ गती-किसन जाधव

सोलापूर‎ व्हिजन

सोलापूर महानगरपालिकेच्या‎ 2026-27 या आर्थिक‎ वर्षासाठी‎ 1449 कोटी‎ 71‎ लाख‎ 93 हजार 401 रुपयांचे‎ अंदाजपत्रक सोमवारी सर्वसाधारण‎ सभेत मंजूर‎ करण्यात आले.‎ स्थायी‎ समिती सभापती रंजिता चाकोते यांनी सभागृहात‎ हा अर्थसंकल्प सादर‎ केला. शहराच्या‎ सर्वांगीण‎ विकासाच्या दृष्टीने‎ सादर‎ करण्यात‎ आलेल्या या‎ बजेटमध्ये पायाभूत सुविधा,‎ स्वच्छता,‎ पाणीपुरवठा,‎ रस्ते विकास‎ आणि सामाजिक‎ उपक्रमांना‎ प्राधान्य देण्यात‎ आले आहे.‎ यावेळी‎ भाजपा‎ नगरसेवक‎ किसन जाधव यांनी बजेटवर‎ आपली‎ भूमिका मांडताना‎ प्रशासनाच्या‎ कार्यपद्धतीतील‎ काही‎ त्रुटी‎ सभागृहात‎ अधोरेखित केल्या. महापौर विनायक कोंडयाल,‎ उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी देवकर, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,‎ सभागृह नेते नरेंद्र‎ काळे आणि स्थायी‎ समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या नेतृत्वाचे‎ कौतुक‎ करत त्यांनी‎ हे‎ बजेट‎ सोलापूरच्या प्रगतीसाठी‎ महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास‎ व्यक्त‎ केला. मागील‎ साडेचार वर्षांच्या प्रशासकीय‎ कालावधीचा‎ उल्लेख करताना जाधव‎ यांनी‎ महसूल‎ संकलन‎ अपेक्षेप्रमाणे‎ झाले‎ नसल्याचे नमूद‎ केले.‎ तसेच‎ त्या‎ कालावधीत घेतलेल्या निर्णयांची‎ सविस्तर‎ माहिती सभागृहासमोर‎ सादर करण्याची आवश्यकता‎ त्यांनी‎ व्यक्त‎ केली. याशिवाय,‎ प्रशासकीय‎ कालावधीत डीपी प्लॅन शासनाकडे पाठवण्यात‎ आला असला तरी‎ त्यासाठी‎ सभागृहाची‎ मंजुरी‎ घेणे‎ आवश्यक‎ असल्याचे त्यांनी स्पष्ट‎ केले.‎ प्रशासनाने सदस्यांना विश्वासात घेऊन‎ डीपी‎ प्लॅन‎ पुन्हा शासनाकडे पाठवावा, अशी‎ मागणी त्यांनी‎ केली.‎ तसेच‎ अद्याप प्रशासनाच्या वतीने आवश्यक रिव्हिजन‎ करण्यात‎ आलेले‎ नसून‎ ते‎ तात्काळ करावे,‎ अशी मागणीही‎ त्यांनी केली.‎ गेल्या‎ साडेचार वर्षांच्या प्रशासकीय‎ कालावधीत‎ सोलापूर शहराच्या विकासासाठी घेतलेले‎ निर्णय‎ तसेच शासनाकडे‎ पाठवलेले‎ प्रलंबित प्रस्ताव यांची‎ पुस्तिका‎ तयार‎ करून‎ येत्या दोन‎ महिन्यांत सभागृहात‎ सादर करावी, असेही त्यांनी‎ सांगितले. दरम्यान,‎ मूलभूत कामांमधून‎ मिळणाऱ्या‎ उत्पन्नाचा हेड पूर्वीच्या‎ अंदाजपत्रकात नमूद‎ होता;‎ मात्र अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो‎ वगळण्यात‎ आल्याने‎ महापालिकेला सुमारे 100‎ कोटी‎ रुपयांचा‎ फटका बसल्याचा‎ आरोप‎ जाधव यांनी केला. पाणीप्रश्नावर‎ बोलताना काँग्रेसचे‎ चेतन‎ नरोटे यांच्या टीकेला उत्तर‎ देताना जाधव म्हणाले की, सोलापूर शहराला‎ सुरळीत‎ पाणीपुरवठा‎ व्हावा‎ यासाठी‎ आमदार‎ देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे‎ मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी उजनी ते‎ सोलापूर‎ दुहेरी‎ पाईपलाईन‎ प्रकल्पासाठी 892 कोटी‎ रुपयांचा निधी‎ मंजूर केला आहे. या‎ प्रकल्पामुळे भविष्यात‎ पाणीपुरवठा सुधारण्यास‎ मदत‎ होईल, असा विश्वास‎ त्यांनी व्यक्त केला‎ पक्षीय राजकारण करण्याऐवजी विकासाच्या‎ मुद्द्यांवर लक्ष‎ केंद्रित‎ करणे‎ गरजेचे आहे, असा संदेश देत जाधव‎ यांनी‎ विरोधकांना टोला लगावला.‎ नव्या उत्पन्न स्रोतांचा‎ शोध घेण्यावर भर‎ देणारे हे बजेट महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम‎ बनवण्याचा‎ प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *