सोलापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासून सुरु !
१० प्रवाशांना बोर्डिंग पास अन् पूरग्रस्तांना कीटचे वाटप सोलापुरात ‘स्टार ‘कडून छोटेखानी सत्कारसोहळा

सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १५ ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावर सोलापूर-मुंबई विमानसेवेचे उद्घाटन होणार असून, सोलापुरातील विमानतळावर स्टार या विमान कंपनी संचालकांकडून त्यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी २ वाजता स्टार एअर कंपनीच्या विमानाने मुख्यमंत्री सोलापुरात दाखल होणार असून, दहा प्रवाशांना बोर्डिंग पास त्यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत. त्यानंतर पूरग्रस्तांना रेशन किट वाटप कार्यक्रमही पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी

कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळावर आढावा बैठक घेतली. या बैठकीला पोलिस आयुक्त एम. राजकुमार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. विमानतळ परिसरात मंडप उभारणीचे काम सुरू असून, भाजपाचे स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

सोलापुरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे पंढरपूर तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते मंगळवेढा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ
भाजपाकडून विमानाचे होणार जंगी स्वागत सोलापूर-मुंबई विमानसेवेची सोलापूरकरांना लागलेली प्रतिक्षा आज संपणार आहे. स्टार विमान कंपनीद्वारे मुंबईहून येणाऱ्या पहिल्या विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून, त्यांच्या विमानाच्या स्वागतासाठी भारतीय जनता पार्टीकडून जंगी तयारी केली आहे. विमान सोलापुरात येताच आकाशात मोठ्या प्रमाणात फुगेही सोडण्यात येणार आहे. चौकाचौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात येणार आहे.

सोलापूरच्या तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजेच आपल्या लाडक्या देवा भाऊंचे आणि केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे श्री सिद्धरामेश्वरांच्या पुण्यनगरीत मनःपूर्वक हार्दिक स्वागत !

स्वागतोत्सुक – आमदार श्री सचिन दादा कल्याणशेट्टी आणि आमदार श्री देवेंद्र दादा कोठे, भारतीय जनता पार्टी, सोलापूर