सोलापूर महानगरपालिकेची रस्त्यांवरील ‘अजोरा, मलबा, उचलणे कामास प्रारंभ
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बेसे यांच्या आदेश नुसार शहरातील विविध रस्त्यालगतचा आणि पदपथांवरील ‘अजोरा, मलबा हटवण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी करण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली.
सोलापूर महापालिकेकडून शहरातील 8 झोन मधील विविध रस्त्यावर राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पडलेला अजोरा,बांधकाम साहित्याचा राडारोडा हा जेसीबी आणि डंपरच्या मदतीने हटवण्यात आला.
मोहिमेतील प्रमुख ठिकाणे:


आजच्या मोहिमे करीता ८ जेसीबी आणि ७ डंपर चा वापर करण्यात आला.
* झोन क्र. १: लक्ष्मी मार्केटजवळील दोन ठिकाणे, पंच कट्टा.
* झोन क्र. २: मड्डी वस्ती (दोन ठिकाणे), रूपाभवानी मंदिर.
* झोन क्र. ३: कन्ना चौक, लक्ष्मी मंदिर, विणकर बाग, कोंडळे .
* झोन क्र. ४: माधव नगर, विमान तळ, पाटील नगर.
* झोन क्र. ५: वामन नगर, डी-मार्ट समोर, कंबर तलाव.
* झोन क्र. ६: सलगर वस्ती परिसर.
* झोन क्र. ७: पासपोर्ट ऑफिस ते फडकुले सभागृह, आपतकालीन रस्ता, पोटफाडी चौक (मच्छीवाला सार्वजनिक शौचालय).
* झोन क्र. ८: २ न ST स्थानक ते शानदार चौक ते लेप्रेसी ट्रान्स्फर स्टेशन.
महापालिकेच्या या दर
शुक्रवारच्या विशेष मोहिमेमुळे शहर अधिक स्वच्छ होण्यास हातभार लागणार आहे व सदर मोहीम ही सातत्याने केली जाणार आहे असे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले.