चार लाख साठ हजारांच्या थकबाकीपोटी शाळेवर कारवाई…..
महापालिका प्रशासनाने नेहरूनगर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक कक्ष केले सील….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज ,
सोलापूर , दि. ६ सप्टेंबर – सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या आदेशाने व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत विजापूर रोड, नेहरुनगर येथील मिळकत क्रमांक ३०१०८४ पोस्ट बेसिक आश्रम शाळा याची माहे सप्टेंबर २०२३ अखेर पर्यंतची थकबाकी रु. २,११,७०४ मिळकत क्रमांक ३०१२२८ प्राथमिक गांधी आश्रम शाळा नेहरूनगर यांची रक्कम ४,६०,८८६ /- इतक्या थकबाकीपोटी दोनही प्रशालांचे मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय सील करण्यात आले आहे.
सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांना कळविण्यात येते की, मिळकतदार यांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा ज्या मिळकतदारानी मालमत्ता कराची रक्कम भरणार नाही अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.