सोलापूर महानगरपालिकेच्या “घट संकलन ” उपक्रमास
सोलापूरकरांनी दिला उदंड प्रतिसाद…
सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त निर्देशांनुसार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभरात “स्वच्छता ही सेवा २०२५” हा पंधरवडा राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून “स्वच्छ हरित उत्सव” साजरा करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

त्याअनुषंगाने सोलापूर शहरात दरवर्षी घटस्थापना हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात नागरिक घरामध्ये घटाची (कलश),स्थापना करतात. दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी (दसरा) सण साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवाचा समारोप करताना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शहरात घटस्थापनेचे घट विसर्जन करण्याची प्रथा आहे.पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून यावर्षी घट विसर्जनासाठी एक नवा उपक्रम सोलापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात आला. त्यानुसार, शहरातील विविध उद्यानांमध्ये एकूण २६ ठिकाणी “घट संकलन केंद्रे” स्थापन करण्यात आले होते.३ऑक्टोबर २०२५रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घट संकलन करण्यात आले. सदर मोहिमेस सोलापूरकर यांच्याकडून उदंड प्रतिसाद लाभला सोलापूरकरांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेले दिसून आले याप्रसंगी सोलापुरातून तब्बल 2097 कुटुंबांनी घट संकलन केंद्रात आपले घट संकलित करण्यासाठी प्रतिसाद दिला. सदर घटाचे उद्यान विभागाकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरावरून, सर्व वर्गातून होत आहे. इतर स्थानिक स्वराज्य संस्थेने देखील सदर प्रकारचा उपक्रम राबवण्यात विषयी भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सर्व सोलापूरकरांनी या संकल्पनेला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले .अशाच पद्धतीने आपण स्वच्छ व सुंदर सोलापूर ही संकल्पना राबविण्यासाठी कटिबद्ध आहेत असे याप्रसंगी सांगितले.