कॅनरा बँकेचा सी.एस. आर फंड तसेच महापालिकेचे एक कोटींचे बक्षीस यातून होणार कायापालट..आयुक्तांची माहिती….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज
सोलापूर, दि. ३० ऑगस्ट – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री मार्कंडेय उद्यान येथे सोलापूर शहरातील लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी चांगल्या सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे या हेतूने मार्कंडेय उद्याने येथे अत्याधुनिक साहित्य बसवण्यात आले असून त्याची पाहणी आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांनी केली.
कॅनरा बँकेच्या सी.एस.आर फंडातून ३९ लाख ९७ हजार ४६५ इतके रुपये खर्च करून शहरातील मार्कंडेय उद्यानासह, सात रस्ता येथील नाना नानी पार्क, साधू वासवानी उद्यान, या उद्यानात लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळण्याचे साहित्य बसवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे साधू वासवानी, मुदगल उद्यान, नाना नानी पार्क येथे माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला मिळालेल्या एक कोटी बक्षीसातून तिन्ही उद्यान विकसित करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. याप्रसंगी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता सारिका अकुलवार, उप अभियंता किशोर सातपुते, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, अभिजीत बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.