निवडणुकीचे वाहू लागले वारे ; प्रभाग २१ मध्ये रियाज हुंडेकरी दादा आणि टेकाळे यासह उबाठा आले एकत्र 

माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रतीक्षा निकाळजे आणि किरण टेकाळे यांचे अर्ज काँग्रेस कमिटीमध्ये सादर

निवडणुकीचे वाहू लागले वारे ; रियाज हुंडेकरी दादा आणि टेकाळे यासह उबाठा आले एकत्र 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.११ डिसेंबर

सोलापूर महानगरपालिकेचे निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागले आहे. जानेवारी महिन्यात निवडणुकीचा धुराळा पुढील असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने देखील निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. नुकतेच सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीची बैठक घेऊन महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची घोषणा केली आहे.

 

दरम्यान, त्या अनुषंगाने महाविकास आघाडीची इलेक्टिव्ह मेरिट यादी तयार केली जात आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाचे प्राबल्य आहे त्या पक्षाला प्राधान्य देणे असे गमक आघाडीने शोधले आहे. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष आपापल्या बालेकिल्ल्यत उमेदवार निश्चित करत असल्याचे चित्र दिसत आहे .

त्याचा अनुषंगाने काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी यांनी आपला पारंपारिक १८ नंबर प्रभाग सोडून शेजारच्या एकवीस नंबर प्रभागात जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कडे दाखल केला. सोबतीला अनुसूचित जाती महिलेतून माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्या कन्या प्रतीक्षा निकाळजे, सर्वसाधारण महिलेतून भीमाशंकर टेकाळे यांच्या सून किरण शीतलकुमार टेकाळे तर सर्वसाधारण जागेसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतून भीमाशंकर म्हेत्रे हे येणार असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वी २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये रियाज हुंडेकरी हे प्रभाग १८ मधून चारच्या पॅनल मध्ये एकमेव निवडून आले होते बाकी उर्वरित तीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले. पण यावेळी मात्र निकाळजे यांनी प्रभाग बदलून ते आता शेजारच्या २१ नंबर मध्ये गेले आहेत.

 

प्रभाग २१ मध्ये रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे आणि भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे आणि शिवसेनेचे भीमाशंकर म्हेत्रे महाविकास आघाडीतून एकत्र आल्याने पॅनल मजबूत झाल्याचे पाहायला मिळते. सर्वसाधारण जागेसाठी लिंगायत समाजातून उमेदवार आल्यास काँग्रेससाठी वातावरण चांगले राहील असे कार्यकर्त्यांमधून चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *