सी.ई.ओ यांच्या सूचनेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले गाव भेट दौऱ्यावर…
पंढरपूर उपकेंद्राची पाहणी करत नव्या विषाणू संदर्भात दिल्या मार्गदर्शक सूचना
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.०९ जानेवारी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या व अडचणी तातडीने सोडवाव्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावभेट दौरे करून विकास कामासह प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत यांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्या होत्या. त्याच सूचनेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नवले यांनी तत्परता दाखवत तातडीने पंढरपूर व माढा तालुक्यात गाव भेट दौरे करत विविध विकास कामांचा आढावा घेत, नव्या विषाणू संदर्भात मार्गदर्शक सूचनांची माहिती गाव पातळीवर दिली.
दरम्यान, या आढावा पाहणीत नव्या विषाणू संदर्भात उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती देताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यात नव्याने बांधकाम होत असलेल्या विविध उपकेंद्रांची पाहणी केली. ग्रामीण भागामध्ये नव्या विषाणू संदर्भात जागरूकता आणि सावधानता बाळगण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने सूचना जारी करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्रामध्ये उपचार घ्यावा. आजार अंगावर काढू नये यासाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात नव्याने ३२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती.
सोलापूर जिल्ह्यात नव्याने ३२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची निर्मिती होत आहे. उपकेंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर असून, त्या कामाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे नव्या विषाणू संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. त्याच पद्धतीने पंढरपूर व माढा तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची पाहणी केली. आपला दवाखाना अंतर्गत कामाचा आढावा घेऊन सतर्क व सजग राहण्याच्या सूचना केल्या. ग्रामस्थांना कोणताही त्रास झाल्यास आजार अंगावर न काढता तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेण्यासंबंधी सूचना केल्या.
– डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.