जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे स्त्युत्य उपक्रम ….

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे १०० झाडांचे रोपण…

विद्यापीठात बहरणार फळझाडे : ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी १०० पीडितांना न्याय मिळवून दिल्याबद्दल झाला उपक्रम……

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर दि. २९ ऑगस्ट – सोलापूर जनता सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक आणि सोलापूर जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी १०० पीडितांना न्याय मिळवून दिल्याबद्दल जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे १०० झाडांचे रोपण करण्याचा उपक्रम गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यापीठ परिसरात लवकरच १०० फळझाडे बहरणार आहेत.

        सोलापूर जिल्हा सहकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी १०० गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून दिली. १०० पीडित कुटुंबीयांना त्यांच्यामुळे न्याय मिळाला. याचे औचित्य साधून १०० सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंबा, पेरू आदी फळांची १०० झाडे लावण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू प्रा.डॉ. लक्ष्मीकांत दामा, सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक ॲड. प्रदिपसिंग राजपूत, पुरूषोत्तम उडता, आनंद कुलकर्णी, जगदिश भुतडा, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात झाला.

 

               याप्रसंगी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. योगिनी घारे, परिक्षा मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, व्यवस्थापन समिती सदस्य देवानंद चिलवंत, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, सोलापूर जनता सहकारी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक मकरंद जोशी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार, प्रशासन अधिकारी मदन मोरे, बँकेचे अधिकारी सुधांशु रानडे, किरण आंबरे, सुहास मुळजकर, पवन रणसुभे, शाखाधिकारी मंजिरी फडके, नीला गताटे, माधुरी कुलकर्णी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या उपाध्यक्षा प्रिती चव्हाण आदी उपस्थित होते.याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. योगिनी घारे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुहास मुळजकर यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *