इलेक्ट्राेचे थाटात उद्घाटन यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष विशेष आकर्षणाचे….

सोलापूरकरांनी ऑनलाईन खरेदीपेक्षा प्रत्यक्ष खरेदीला महत्त्व द्यावे – महापालिका आयुक्त शितल तेली उगले

इलेक्ट्राेचे थाटात उद्घाटन यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष विशेष आकर्षणाचे  !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१२ फेब्रुवारी

सध्या ऑनलाईन खरेदीचा टक्का वाढत आहे सोलापूरच्या ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी कडे लक्ष न देता सध्या होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनामधून आपल्या गरजेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करून सोलापूर मधला पैसा सोलापुरातच फिरता ठेवावा असे महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी व्यक्त केले.

                  साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशनद्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स, टेलिकम्युनिकेशन, हाेम अ‍ॅप्लायन्सेस, साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तूंचे भव्यप्रदर्शन ‘‘इलेक्ट्राे २०२५’’ प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शार्प बिझनेस सिस्टमस् इंडिया लिचे बिझनेस हेड वसंत जाेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलित करून आणि फीत कापून उद्घाटन करण्यात आले.    दि.१२ ते १८ फेेब्रुवारी या कालावधी दरम्यान हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले आहे. यंदा इलेक्ट्राे प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायाेजक असून हायफा इलेकट्रीकल्स व एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सह प्रायाेजक आहेत.

       तद्नंतर इलेक्ट्राे चेअरमन दिपक मुनाेत यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की यंदा प्रथमच ५ वेगळे जर्मन हँगर प्रकारच्या डाेम मध्ये हे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. क्युआर काेडद्वारे सर्व सहभागी स्टाॅलची माहिती ग्राहकांना आपल्या माेबाईलवर पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती दिली. काही स्टाॅल्स् सामाजिक संघटनांना विनामुल्य देण्यात आलेली आहेत.या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दरराेज लकी ड्राॅद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी ७ दिवसांत खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्राॅमध्ये आकर्षक बक्षिस असल्याची घाेषणा करण्यात आली. तत्पूर्वी इलेक्ट्रो २०२५ या नव्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.               हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आयोजक प्रदर्शक आणि प्रायोजकांचे कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. शार्प कंपनीचे बिझनेस हेड वंसत जाेशी यांनी आपल्या भाषणात अश्या प्रकारचे एखाद्या व्यवसाईक संघटनेच्या अधिपत्याखाली हाेणारे हे प्रदर्शन संयाेजकांचे प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असे गाैरवाेद्गार काढले.

 तत्पूर्वी, इलेक्ट्राेचे अध्यक्ष आनंद येमुल यांनी आपले प्रास्ताविकेत म्हणाले की, इलेक्ट्राे २०२५ चे हे २५ वे वर्ष  असून २४ वर्षापूर्वी २० स्टाॅल्सने सुरु झालेले हे प्रदर्शन आज जवळपास ३०० स्टाॅलचे प्रदर्शन झाले असल्याचे सांगतिलेे. आतापर्यंत इलेक्ट्राेने केलेल्या कामाची व ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असे येमुल यांनी सांगितले. त्याच प्रमाणे संघटनेच्या पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमाने हे भव्यदिव्य प्रदर्शन यशस्वी होत असल्याचे सांगितले. या वर्षी जवळपास एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज व्यक्त केला.  या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, कॉम्पुटर्स, टेली कम्युनिकशेन्स ,हेल्थ इक्वीपमेंट, सोलर प्रॉडक्ट्स इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. अशा या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी शुध्द पिण्याचे पाणीची साेय केलेली आहे. सर्व स्टाॅल मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कंपनी कडून ट्रेनिंग देवून ग्राहकांना माहिती देण्यात येते. रक्तदान प्रसार करण्याकरीता दरराेज रक्तदान शिबीराचेही आयाेजन करण्यात आले असून अवयव दान विषयी जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती सचिव भुषण भुतडा यांनी दिली.

     या कार्यक्रमास सह सचिव हरीष कुकरेजा,  खजिनदार सुयाेग कालाणी, संस्थेचे माजी अध्यक्ष सतिश मालू, केतन शाह, आनंदराज दाेशी, दिलीप राऊत, समिर गांधी, विपीन कुलकर्णी ,जितेंद्र राठी, काैशिक शाह , खुशाल देढीया, ईश्वर मालू सह संचालक सर्वश्री संदेश काेठारी, राजेश जाजु, चंद्रकांत शाहपुरे, रवि पाचलग, बसवराज नवले, श्री यल्लपा भाेसले, गणेश सुत्रावे सह सदस्य  विजय टेके , पवन मुंदडा, सचिन करवा, दत्तात्र्य अंबुरे, जाॅय छाबरिया                               ग्राहक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *