प्रभाग 26 मधील मंजूर डी.पी.रस्त्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले स्मरणपत्र….
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि ४ ऑगस्ट – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जुना प्रभाग क्रमांक 26 ब मधील मंजूर तक्त्याप्रमाणे नमूद डांबरी डी.पी. रस्त्याची शासनाच्या योजनेतून मंजूर करून त्यांना शासन प्रशासन स्तरावर निधी उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक १४/१/२०२४ रोजी निवेदन दिले होते. ते अद्याप पर्यंत मंजूर झाले नाही.
दरम्यान याचबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडून स्मरणपत्र निवेदन देण्यात आले आहे. मंजूर डी.पी. रस्ते झाल्यास जुळे सोलापूरकरांचा कायमचा प्रश्न सुटणार आहे.
प्रभाग 26 ब मधील स्मरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या बाबी खालील प्रमाणे…..
१)रेणुका नगर येथील भीमाशंकर अपार्टमेंट ते उद्धव नगर भाग एक प्लॉट नंबर 18 गदगी घरापर्यंत डी.पी. रस्ता मंजूर असून सदर ठिकाणी डांबरी रस्ता होण्याबाबत.
२) प्रभाग २६ ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका नगर जवळील भीमाशंकर अपार्टमेंट येथील डांबरी रस्ता करणे.
३) प्रभाग 26 ब मधील रेणुका नगर भीमाशंकर अपार्टमेंट,श्रीकृष्ण बाग, साक्षीनगर,उद्धवनगर, रेणुका नगर, बंडे नगर ,दततारा पार्क, प्रल्हाद नगर,प्रियंका नगर,रजनीश रेसिडेन्सी पार्क,आदित्य रेसिडेन्सी,विश्व नगर, शिवभारत पार्क,चंडक मळा ते विजापूर रोड हायवे टच डी.पी. रस्ता मंजूर असून सदर ठिकाणी डांबरी रस्ते करणे.
४) प्रभाग 26 ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका नगर प्लॉट नंबर 712 ते कटगरी सर प्लॉट नंबर 671 सर्वे नंबर ९९/१/ब येथे डी.पी. रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरी रस्ता करणे.
५) प्रभाग २६ ब मधील रेणुका नगर प्लॉट नंबर 520 ते रेणुका नगर प्लॉट नंबर 16 पर्यंत डी.पी. रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरी रस्ता करणे.
६) तसेच प्रभाग 26 ब मधील कोरे वस्ती, शाहूनगर,राऊत वस्ती,वास्तु विहार नगर, ए जी पाटील नगर,परमेश्वर नगर, कल्याण नगर भाग एक ते तीन, समर्थ नगर,मीना नगर,बंडापानगर,सुभाष शहा नगर,असे जवळपास 30 नगरांमधील समस्या उदा. ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते,दिवाबत्ती करणे.
७) आदिवासी पारधी समाजातील आय.टी.आय. कोर्स पूर्ण करून महावितरण कडून कोर्स पूर्ण करून सुद्धा उद्यापर्यंत त्यांना नोकरीची संधी देण्यात आलेली नाही त्यामुळे आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून त्यांना लवकरात लवकर महावितरण विभागात नोकरीची संधी मिळवून द्यावी. सर्व प्रलंबित मागण्याचे स्मरणपत्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिलेले आहेत.