सराफ व्यापारी माणिक नारायणपेठकर याचा जामीन फेटाळला..

बलात्कार प्रकरणी सराफ व्यापारी माणिक नारायणपेठकर याचा जामीन फेटाळला.

सोलापूर- ऑर्केस्ट्रा आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायणपेठकर रा.सोलापूर याचा जामीन अर्ज मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.एस.व्ही.केंद्रे सो यांनी आज फेटाळला.यात हकिकत अशी की, पिडीता हि कामानिमित्त फेब्रुवारी 2024 मध्ये सोलापूर येथे आली होती.त्यावेळी पिडीता हि तिचे भावाला अंगठी खरेदी करिता आरोपी चे नारायणपेठकर ज्वेलर्स मध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने पिडीतेची खाजगी माहिती व व कोठून आला आहात अशी माहिती विचारली.त्यावेळी पिडितेने त्यास मी आँर्केस्टा असून काम शोधत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने  पिडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असे म्हणून पिडीतेसोबत सलगी वाढवली व पिडीतेचा मोबाईल नंबर मागून घेतला.तदनंतर आरोपी हा पिडीतेसोबत फोनवरून बोलणं सुरु झाले.तदनंतर दि. पुन्हा पिडीता हि सोने खरेदी करण्यासाठी आरोपी चे दुकानात गेली त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पिडितेने आँनलाईन पेमेंट पाठवले व तेथून निघून गेली. तदनंतर त्याच दिवशी आरोपीने पिडीतेस सांयकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सांयकाळी बार्शी  रोड येथे येण्यास सांगितले. त्यामुळे पिडीता हि रिक्षा ने त्याठिकाणी बार्शी रोडवरील एका लाँजवर गेली त्याठिकाणी आरोपीने पिडीतेवर तिचे ईच्छेविरूध्द जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदुक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेस तुला ठार मारेल अशी धमकी दिली.अशा आशयाची फिर्याद पिडितेने आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केली.सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायणपेठकर यास दि.31/5/2024 रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे आरोपींने  मे.न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.यात मुळफिर्यादीतफे अँड. संतोष न्हावकर यांनी व सरकारतर्फे अँड शैलजा क्यातम यांनी युक्तिवाद सादर करून जामीन अर्जास तीव्र विरोध केला. अँड संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा धनदांडगा सावकारी व सराफ व्यवसाय करणारा असून फिर्याद दाखल केल्यापासून फिर्यादी व पोलिसांवर दबाव आणत असल्याचे मे.न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून मे.न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. यात मुळफिर्यादीतफे अँड. संतोष न्हावकर, अँड राहुल रुपनर यांनी,सरकार पक्षातर्फे अँड. शैलजा क्यायम यांनी तर आरोपी तफे अँड. शशी कुलकर्णी यांनी काम पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *