जुळे सोलापूर येथील प्रभाग २६ मध्ये ड्रेनेजची कामे पूर्णत्वास ; नागरिकांमध्ये समाधानचे वातावरण…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दी.२९ जानेवारी
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ च्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या पथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.जुळे सोलापुरातील विशेष करून प्रभाग २६ मध्ये हद्दवाढ झाल्यापासून ड्रेनेजची कामे अर्धवट झाली होती. अनेक नगरातील नागरिक यांनी ड्रेनेजसाठी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदने सादर केलेली होती. त्यानुसार प्रभाग २६ मधील विविध नगरात प्रत्यक्ष पाहणी करून कृष्णा कॉलनी, रोहिणी नगर भाग एक, द्वारका नगर, उद्धव नगर भाग एक व दोन, रेणुका नगर, सुभाष शहा नगर, गुरुदेव दत्त नगर भाग एक ते सहा, रत्न मंजिरी नगर, बंडापा नगर, राऊत वस्ती, अशा अनेक नगरामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी यांना ड्रेनेज समस्या बाबत लेखी निवेदन दिले होते.
दरम्यान, त्या कामाचे एकूण खर्चाचा तपशील महानगरपालिकेने तयार करून शासन दरबारी पाठवण्यात आला होता. शासनाच्या मूलभूत सुविधा व सवर्ण योजना नगरोस्थान योजनेतून सदर कामे मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून अनेक नगरामध्ये ड्रेनेजचे कामे सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचाच एक भाग म्हणून उद्धव नगर भाग एक मध्ये नागरिकाच्या वतीने नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हदवाढ झाल्यापासून सदर नगरामध्ये आम्ही वास्तव्यास राहण्यास असून आम्हाला ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते,दिवाबत्ती अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यापासून प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकून दिली व आता प्रत्यक्ष ड्रेनेजचे काम सुरू केले असून लवकरच शासनाच्या मूलभूत सुविधा व सवर्ण योजना नगरोस्थान योजनेतून अंतर्गत रस्ते करण्यात येईल व त्याचा पाठपुरावा सुरू असून अनेक कामे मंजूर आहेत असे ठोस आश्वासन दिलेले असून अशा नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्यक्ष पाठपुरावा करणाऱ्या कर्तव्यदक्ष नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले. यावेळी विशाल माने,राठोड ,शिवाजी वाघमारे, मनोज गायकवाड, आदीं नगरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.