आंतरराज्यीय चोरट्याला हरियाणात ठोकल्या बेड्या ! शहर गुन्हेशाखेची धडाकेबाज कामगिरी

आंतरराज्यीय चोरट्याला हरियाणात ठोकल्या बेड्या !

सोलापूर एसटी स्टॅन्ड मधून पळवलेले ४,७६,७०० किमतीचे सोन्याचे दागिने केले हस्तगत ;

शहर गुन्हेशाखेची धडाकेबाज कामगिरी…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर दि.९ जुलै

सोलापूर बस स्थानक परिसरात वाढत असलेल्या चोऱ्याचे प्रमाण लक्षात घेता शहर पोलीस गुन्हे शाखा चोरांच्या मागावर होते. मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटनेची उकल झाली असून आंतरराज्य चोरट्याच्या हरियाणा येथून मुसक्या आवळण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चोरीचा घटनेतील तक्रारदार परमेश्वर नरसप्पा बेळे (वय-५९ वर्षे, व्यवसाय: नोकरी, रा. रुम नं. सी/९, मनोहर भगत, बिल्डींग, तुकाराम नगर आयरे रोड, डोंबिवली पूर्व) हे नोकरी निमित्त मुंबईत राहतात, त्यांचे मुळ गांव वडगांव वाडी ता. लोहारा जि. धाराशीव हे आहे.      (दिना. १४ मे ) रोजी काही कामानिमित्त मुळगाव- वडगांव वाडी, (ता. लोहारा, जि. धाराशीव ) येथे सहकुटुंब गावी आले होते. गावाकडील कामे संपवून, ते पुन्हा (दि. २१) रोजी मुंबईकडे जाण्यासाठी सोलापूर बसस्टॅण्डवर आले.

   सोलापूर पुणे बसमध्ये सहकुटुंब बसले तेव्हा गर्दीमध्ये दोन अज्ञात व्यक्तींपैकी एका व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून, दुसऱ्या व्यक्तीने त्यांचे बॅगमधील सुमारे ४,७६,७००/- रु. किंमतीचे, ९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बैंग फाडून चोरल्याची घटना घडली. परमेश्वर  बेळे यांच्या फिर्यादीवरुन, फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे, गुन्हा रजि नं. ३७७/२०२५ भा. न्या. सं.२०२३ कलम ३०५ (सी), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे , सहाय्यक निरीक्षक शैलेश खेडकर त्यांचे तपास पथकातील अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. सहाय्यक निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळाचे आजू-बाजूचे परिसराचे बारकाईने निरीक्षण केले. पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाचे आजू बाजूचे परिसरातील सी.सी. टी. व्ही कॅमे-यामधील फुटेज बाबतची तांत्रीक माहिती अत्यंत बारकाईने निरीक्षण करुन संकलित केल्यानंतर तपास पथकास एका संशयीत व्यक्तीवर, संशय निर्माण झाल्याने, त्याबाबत अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. माहिती संकलित करीत असताना, तपास पथकास सदरचा आरोपी हा बसस्थानकांवर चोरी करणारा, सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार असून, त्याच्यावर उत्तरप्रदेश राज्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळाली.

       तपास पथकाने संकलीत केलेली तांत्रीक व गोपनीय माहिती या दोन्ही बाबींचा सहाय्याने पथकाने, सदरचा गुन्हा करणारा संशयित आरोपी अजयकुमार बजरंगलाल सांसी, (वय २६ वर्षे, व्यवसाय: मजूरी, रा. किरोरी, ता. हिसार जि. हिसार, राज्य हरियाणा) हा असल्याची खात्री झाली. तपास पथकाला हरियाणा येथे जाण्याची परवानगी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने, हरियाणा राज्यातील हिसार जिल्हयातील किरोरी या गावातून, स्थानिक पोलीसांच्या मदतीने, आरोपी अजयकुमार बजरंगलाल सांसी, (वय २६ वर्षे, व्यवसाय मजूरी रा. किरोरी, ता. हिसार जि. हिसार, राज्य हरियाणा) याला बेड्या ठोकून ताब्यात घेतले.  तपास पथकाने आरोपीकडे अत्यंत कौशल्याने तपास केला असता, त्याने, (दि.२१/०५/२०२५) रोजी सोलापूर बस स्टॅण्ड येथे चोरीचा गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी, पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त, गुन्हे डॉ. अश्विनी पाटील, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, चालक पोहेकॉ. फरदिन शेख तसेच सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *