देवेंद्र दादांच्या मागणीला अजित दादांचा ग्रीन सिग्नल ; सिव्हील हॉस्पिटलमध्ये येणार एम. आर. आय मशीन
गोर गरीब व गरजू रुग्णांना मिळणार संजीवनी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ फेब्रुवारी
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नियोजन समितीची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीस उपस्थित राहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासाठी (सिव्हील हॉस्पिटल) नवीन एम.आर.आय मशीनची मागणी केली.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी एम.आर.आय मशीनच्या गरजे संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित निधीची उपलब्धता करून एम.आर.आय मशीन मंजूर करण्याचे आदेश संबंधित सचिवांना दिले.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिकेचे आयुक्त शितल तेली उगले यांच्यासह आणि मान्यवर उपस्थित होते.